Banana Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

Summer Heat : दाही चढ्या तापमानामुळे नागरिकांचे घराबाहेर निघणे दुरापास्त झाले असून, वाढत्या उष्ण झळांचा फटका शेती पिकांनाही बसू लागला आहे.

Team Agrowon

Jalgaon News : दाही चढ्या तापमानामुळे नागरिकांचे घराबाहेर निघणे दुरापास्त झाले असून, वाढत्या उष्ण झळांचा फटका शेती पिकांनाही बसू लागला आहे. यावल, चोपडा तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या अनेक केळीबागा करपू लागल्या आहेत.

दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे केळी पिकांची वाताहत झाली असून, केळीबागा करपू लागल्या आहेत. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या शिवारात केळी पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण मोठे आहे.

शेतकरी काही दिवसांपासून केळीचे खोड लागवड करण्यापासून त्याची रासायनिक व सेंद्रिय खते देऊन त्याचे पालन पोषण करीत आहेत. केळी पिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक प्रश्‍न मार्गी लागतात.

मात्र, यंदा वाढलेल्या तापमानामुळे केळी बागा जळत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. परिसरात केळीची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. सध्या पारा ४० ते ४५ अंशांपर्यंत गेला आहे व हवेत प्रचंड उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. वाऱ्यामुळे केळीची पाने पूर्णतः फाटत आहेत.

उष्णतेमुळे संपूर्ण केळीबागा जळताना दिसत आहेत. यात विहिरी व कूपनलिकांची पाणी पातळी खोल जात असल्याने पिकाला पाणी देणे अनिश्चित झाले आहे. पिकला पाणी कमी पडल्यामुळे पिके जळू लागली आहेत.

शेतकऱ्यांनी काढलेला या वर्षीचा फळपीक विमासाठी ते उष्णतेच्या निकषात पात्र ठरत असून, लवकरात लवकर विमा कंपनीने केळी पिकाचा पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Local Body Election Results 2025: भाजप सुसाट! मुश्रीफांसह अनेक दिग्गजांना मोठा धक्का, जाणून घ्या कोण, कुठे विजयी?

Cotton Crop Damage: प्रतिकूल हवामान, गुलाबी बोंडअळीचा मोठा फटका! कापूस पीक काढून शेतकरी हरभरा पेरणीकडे वळले

Mango Crop Disease: आंबा पिकावरील ‘लीफ वेबर’

Goat Health Care: शेळ्यांमधील फुप्फुसदाहाची लक्षणे अन् उपाययोजना

Women Success Story: वडिलांचे शेती प्रेम, तळमळीने डॉक्टर कन्या झाली शेतकरी

SCROLL FOR NEXT