Vishnu Pol Agrowon
ॲग्रो विशेष

Foreign Tour : नेदरलँड, बेल्जियम दौऱ्यासाठी केळी निर्यातदार विष्णू पोळ यांची निवड

Team Agrowon

Solapur News : द्विपक्षीय व्यापारास चालना देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या वतीने शेटफळ (ता. करमाळा) येथील लोकविकास शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष विष्णू पोळ यांची नेदरलँड व बेल्जियम देशाच्या दौऱ्यासाठी केळी निर्यातदार प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे.

नेदरलँड व बेल्जियम देशातील व्यापारी प्रतिनिधींशी चर्चा करण्यासाठी भारतीय व्यापाऱ्याच्या शिष्टमंडळात केळी निर्यातदार व्यापारी प्रतिनिधी म्हणून पोळ सहभागी होतील. या निवडीबद्दल शेटफळ ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी वैभव गव्हाणे, नानासाहेब साळुंके, प्रशांत नाईकनवरे, वैभव पोळ, महावीर निंबाळकर, गजेंद्र पोळ, अनिल पोळ उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन्स, (एफआयईओ) या भारतातील सर्वोच्च व्यापार प्रोत्साहन संस्थेच्या वतीने द्विपक्षीय व्यापाराला चालना देण्यासाठी एफआयईओ नेदरलँड आणि बेल्जियममधील भारतीय दूतावासाच्या पाठिंब्याने सरकार १८ ते २० जून २०१४ या कालावधीत नेदरलँडमध्ये अन्न आणि कृषी क्षेत्रातील भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळ पाठवत आहे. त्यानंतर बेल्जियम येथे एक दिवसीय बैठक होणार आहे.

या भेटीदरम्यान, शिष्टमंडळ ॲमस्टरडॅम आणि रॉटरडॅम येथे डच कंपन्यांशी बैठका घेईल, ज्यांचे समन्वय ट्यूलिप मार्केटिंग कंपनी, रॉटरडॅम करत आहे.

जिल्ह्यात निर्यातक्षम केळी उत्पादन होते, परंतु ठरावीक आखाती देशातच त्याची निर्यात होते. या देशातील व्यापार धोरणात बदल झाल्यास केळी निर्यातीवर व दरावर त्याचा परिणाम होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होते. ते टाळण्यासाठी इतर देशांतही केळी निर्यात संधी शोधण्याची गरज असून त्यादृष्टीने हे काम सुरू आहे.
विष्णू पोळ, अध्यक्ष, लोकविकास शेतकरी कंपनी, शेटफळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT