Banana cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Cultivation : पावसाने केळी लागवड रखडली

Banana Plantation : खानदेशात केळीची लागवड पाऊस व गारपिटीने रखडली आहे. केळीचे कंद काढणे, वाहतूक, केळी रोपांचा पुरवठा, लागवड बंद असून, पुढे लागवडीस विलंब होणार आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात केळीची लागवड पाऊस व गारपिटीने रखडली आहे. केळीचे कंद काढणे, वाहतूक, केळी रोपांचा पुरवठा, लागवड बंद असून, पुढे लागवडीस विलंब होणार आहे. विलंबामुळे येत्या काळात पिकाची वाढ आणि नियोजित वेळेत काढणी या बाबींना फटका बसणार आहे.

खानदेशात यंदा कांदेबाग केळीची लागवड वेगाने सुरू आहे. सध्या उशिराच्या बागांची लागवड सुरू आहे. ही लागवड जामनेर, जळगाव, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, चोपडा, धुळ्यातील शिरपूर भागात सुरू आहे. परंतु रविवारी झालेल्या पावसामुळे केळीचे कंद काढण्याचे काम अनेक भागात बंद होते.

यामुळे लागवड रविवारी (ता.२६) बंद होती. अशात रविवारी सायंकाळी व रात्री पाऊस झाला. यामुळे अनेक भागांतील कंद पुरवठादारांनी कंद काढणी सोमवारीदेखील (ता.२७) बंद ठेवली होती. यामुळे केळीची लागवड सोमवारीदेखील अनेक भागात बंद होती. पावसाळी वातावरणामुळे लागवडीसाठी मजूरही येत नसल्याने लागवडीस विलंब होत आहे.

सध्या केळीचे दर टिकून आहेत. तसेच केळीला रोजगार हमी योजनेतून अनुदान मिळत असल्याने लागवड वाढली आहे. यामुळे उशिराची लागवडदेखील अनेक शेतकरी करीत आहेत. परंतु ही लागवड रखडल्याने पुढे हंगामास उशीर होईल. अनेक शेतकऱ्यांनी लागवडीसाठी सऱ्या पाडल्या आहेत.

तसेच रोपांची उपलब्धता करून ठेवली असून रोपे शेतात वातावरणाशी सुसंगत होण्यासाठी ठेवली आहेत. परंतु या पावसाने या रोपांचेही अंशतः नुकसान होईल, अशी भिती आहे. पुढे केळीची लागवड, कंद काढणे, कंदांचा पुरवठा, रोपांचा पुरवठा यासाठी निरभ्र, कोरडे वातावरणाची आवश्‍यकता असते. परंतु पुढील काही दिवस पावसाची शक्यता असल्याने केळी लागवडीस १० ते १२ दिवसांचा विलंब होण्याची शक्यता आहे.

अनेक जण टाळणार लागवड

पुढील सात ते आठ दिवस पावसाळी वातावरण राहिल्यास व पावसाने हजेरी लावल्यास केळीची लागवड अनेक शेतकरी टाळतील. यामुळे केळीच्या कंदांनाही उठाव नसणार आहे. परिणामी केळी कंदांचे दर घसरतील, अशी स्थिती आहे.

सध्या जामनेर, जळगाव, चोपडा तालुक्यात केळी लागवडीचे कंद मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. कंदांचे दर तीन ते साडेचार रुपये प्रतिकंद असे आहेत. परंतु मागणी कमी झाल्यास कंदांचे दर कमी होतील, अशीही स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT