Banana Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Cultivation : खानदेशात केळी लागवड स्थिर

Team Agrowon

Jalgaon Banana News : खानदेशात मृग बहरातील केळी लागवड मे अखेरीस सुरू झाली आहे. लागवड सुरूच आहे. यंदा लागवड स्थिर असून, खानदेशातील क्षेत्र ६० हजार हेक्टरवर असणार आहे.

जळगाव जिल्ह्यात एकूण ५० ते ५१ हजार हेक्टरवर केळी लागवड असणार आहे. धुळ्यात पाच ते सहा हजार आणि नंदुरबारातही पाच हजार हेक्टरवर मृग बहर केळी लागवड केली जाईल. जळगाव जिल्ह्यातील रावेरात सर्वाधिक २१ ते २२ हजार हेक्टरवर मृग बहर केळी लागवड असणार आहे.

केळी लागवडीसाठी शेतकरी कंद, रोपांना पसंती देत आहेत. विविध कंपन्यांची केळीची रोपे १४ ते १६ रुपये प्रतिरोप या दरात मिळत आहेत. अनेक शेतकरी पारंपरिक श्रीमंती, आंबेमोहोर, महालक्ष्मी आदी केळी कंदांची लागवड करीत आहेत.

तर अनेक जण ऊतिसंवर्धित रोपांच्या कापणी पूर्ण झालेल्या केळी बागेतील कंद आणून त्यांची लागवड करीत आहेत. केळी लागवडीसाठी खर्चही अधिकचा येत आहे. कंद काढून ते शेतापर्यंत आणणे व लागवडीसाठी आठ ते १० हजार रुपये खर्च येत आहे. मध्यम, निचरा होणाऱ्या जमिनीत कंद काळ्या कसदार जमिनीत लागवडीसाठी आणले जात आहेत.

तर काळ्या कसदार जमिनीत मध्यम, हलक्या जमिनीतील केळी बागांमधील कंद शेतकरी लागवड करीत आहेत. नंदुरबारमधील शहादा, तळोदा, अक्कलकुवा, छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड, सोयगाव, जळगाव जिल्ह्यातील जामनेर, रावेर, मुक्ताईनगर भागातून शेतकरी कंद आणून त्यांची लागवड करीत आहेत.

अनेक शेतकऱ्यांनी मृग बहरात लागवडीचे नियोजन करून कंपन्यांकडे रोपांची आगाऊ नोंदणी केली होती. या रोपांचाही वेळेत पुरवठा होत असून, त्याची लागवड सुरूच आहे. कमाल शेतकऱ्यांनी लागवड जूनच्या मध्यापासून सुरू केली आहे. कारण जूनच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यातही तापमान अधिक होते.

या महिन्यातही रावेर, मुक्ताईनगर, चोपडा आदी भागांत केळी लागवड सुरू आहे. मागील हंगामातही केळीची लागवड खानदेशात सुमारे ६० हजार हेक्टरवर झाली होती. यंदाही एवढीच लागवड अपेक्षित आहे. कारण शेतकरी क्षेत्र वाढविण्याऐवजी कमी लागवड करून काटेकोर व्यवस्थापन करून अधिकाधिक उत्पादन घेण्यासंबंधी भर देत आहेत.

कंद मुबलक प्रमाणात उपलब्ध होत आहे. दर्जेदार केळी बागांमधील केळी कंदांचे दर प्रतिकंद तीन ते पाच रुपये, असेही आहेत. केळी कंद काढणीनंतर बागा रिकाम्या करून घेण्याचे काम शेतमालक करून घेत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Conservation : जलसंधारणासह जयपूरची पर्यावरणात आघाडी

Green Soybean : हिरव्या सोयाबीनचा आहारात वाढवा वापर

World River Day : चला साजरा करूयात नद्यांचा उत्सव

NAFED Issue : नाफेडचा पर्याय शेतकऱ्यांच्या माथी मारू नका

Infestation Rice & Sugarcane : शेतकरी दुहेरी संकटात, भातावर खोड किड तर उसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव

SCROLL FOR NEXT