Balasaheb Thorat Agrowon
ॲग्रो विशेष

Balasaheb Thorat : जनता आपल्याबरोबर, मी खंबीरपणे उभा

Maharashtra Assembly Election : गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी मागील ४० वर्षे अखंडपणे काम केले. त्यातून संगमनेर तालुका उभा राहिला.

Team Agrowon

Ahilyanagar News : गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी मागील ४० वर्षे अखंडपणे काम केले. त्यातून संगमनेर तालुका उभा राहिला. ही परंपरा आपल्याला यापुढेही जपायची आहे. तालुक्याचा विकास मोडण्यासाठी नवीन लोकप्रतिनिधीचा हत्यार म्हणून वापर होणार आहे.

हिंदू-मुस्लिम द्वेष पसरून काहींनी राजकारण केले. मी ही हिंदू आहे पण सर्व समाजाला सोबत घेऊन काम केले. जनता आपल्याबरोबर, मी खंबीरपणे उभा आहे, असे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले. संगमनेर यशोधन संपर्क कार्यालयाजवळील मैदानावर मंगळवारी (ता. ३) स्नेहसंवाद मेळावा झाला.

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, बाजीराव पाटील खेमनर, माधवराव कानवडे, हिरालाल पगडाल, वसीम भाई आदी उपस्थित होते. श्री. थोरात म्हणाले, की संगमनेर तालुक्यातील जनतेने भरभरून प्रेम केले. मोठ्या कष्टातून तालुका उभा केला. दुष्काळी तालुका ते प्रगतिशील तालुका असा लौकिक देशात पोहोचविला. सुसंस्कृत राजकारणाचा आदर्श पॅटर्न निर्माण केला.

तालुक्यातील गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी राजकारण केले. कधीही कोणाला त्रास दिला नाही. कधी चुकीचा शब्द बोललो नाही. कोणाचे मन दुखवले नाही. १९८५ मध्ये पाण्यासाठी मोठा संघर्ष केला त्यातून ३० टक्के हक्काचे पाणी तालुक्याला मिळाले. ९९ मध्ये राज्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर निळवंडे धरणाच्या कामाला गती दिली.

आदर्श पुनर्वसन करून धरण व कालवे पूर्ण केले. ज्यांनी या कामांमध्ये कोणतेही योगदान दिले नाही ते आता श्रेय घेण्यासाठी पुढे येत आहे. परंतु काम कोणी केले. हे जनतेला माहीत आहे. अजूनही ज्या लोकांना पाणी मिळाले नाही त्यांना पाणी देण्यासाठी काम करायचे आहे. निवडणूक संपली की राजकारण संपले अशी आपली पद्धत आहे. हीच परंपरा जपायची आहे.

मंत्रिपदातून ऐतिहासिक काम

बाळासाहेब थोरात म्हणाले, की १९९९ ला राज्य मंत्रिपदाची शपथ घेतली आणि निळवंडे धरण हाती घेतले. कृषिमंत्री पदाच्या काळामध्ये विद्यापीठांना संशोधनाला चालना देऊन राज्यात सर्वाधिक कृषी उत्पादन केले. जलसंधारणमंत्री असताना एक लाख शेततळी निर्माण केली.

तर शिक्षणमंत्री असताना बेस्ट ऑफ फाइव्हचा ऐतिहासिक निर्णय घेतला. महसूल मंत्रिपदाच्या काळामध्ये विविध देवस्थानांच्या जमिनी, खंडकरी शेतकरी प्रश्‍न, नझुल जमीन असे अनेक प्रश्‍न सोडविताना या खात्याला लोकाभिमुख केले. प्रदेशाध्यक्ष, गटनेता, सतरा वर्षे मंत्री, चाळीस वर्षे आमदार म्हणून काम करताना समाजहित जोपासले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT