Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : पाऊस, वाऱ्यामुळे बाजरी पिकाचे नुकसान

Heavy Rain : गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पाऊस आणि वाऱ्यामुळे हातातोंडाशी आलेल्या बाजरीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Pune News : तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील अनेक गावांमधील बाजरीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पाऊस आणि वाऱ्यामुळे हातातोंडाशी आलेल्या बाजरीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

अनेक वर्षांनंतर यंदा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. खरीप हंगामातील बाजरी पिकासाठी हा पाऊस फारच उपयुक्त ठरल्यामुळे हे पीक चांगलेच जोमात आले आहे. तसेच, ठरावीक अंतराने पडलेल्या पावसामुळे बाजरी पिकाची चांगली जोपासनाही करता आली.

त्यामुळे अगदी फुलोऱ्यात येऊन दाणे भरेपर्यंत हे पीक सुरक्षित होते. बाजरीच्या पिकाचे क्षेत्र जास्त असल्याने पाखरांचा त्रासही अगदीच नगण्य होता. या सर्व गोष्टींमुळे बाजरीचे चांगले उत्पादन मिळण्याची आशा शेतकऱ्यांमध्ये वाढली होती.

काही दिवसांतच बाजरी काढणीला येणार असल्याने त्याचे नियोजन शेतकरी कुटुंबांतून सुरू असतानाच गेल्या आठ दिवसांपासून पावसाने जोर धरला. दिवसभर पावसाच्या सरींवर सरी आणि रात्री जोरदार पाऊस असे निसर्गाचे गणित मागील आठवडाभर सुरू होते.

जोमात असलेल्या पावसामुळे जमिनीतील वाढती ओल आणि वाऱ्याचा वाढता वेग यामुळे अनेक भागातील बाजरीचे पीक आडवे झाले आहे. नुकतेच दाणे भरलेली कणसे अद्याप परिपक्व झाली नसल्याने बाजरीची काढणी करणेही शक्य नाही. त्यामुळे चांगले आलेले पीक डोळ्यादेखत मातीमोल होताना पाहायची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

कृषी विभागाच्या मते ज्या लोकांनी बाजरीला पाणी दिले आहे, बहुदा त्यांचीच पिके आडवी झाली आहेत. मात्र पाणी न दिलेलीही अनेकांची पिके जमीनदोस्त झाली असल्याचे अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यवत आणि भरतगावाच्या शिवारात बाजरीचे अधिक नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

बाजरीचे पीक मागील अनेक वर्षांच्या तुलनेत यंदा चांगले आले होते. केवळ पावसाच्या पाण्यावरच हे पीक यंदा चांगले आले होते. त्यामुळे कमी खर्चात पीक पदरात पडेल अशी आशा होती. मात्र वारा आणि पाऊस यांच्या दुहेरी माऱ्याने हे पीक जमीनदोस्त झाले आहे. वेळेत झालेल्या पावसामुळे बाजरीच्या पिकास पाणी देण्याची गरजच पडली नव्हती.
- पंडितभाऊ दोरगे, शेतकरी, यवत

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT