Fodder  Agrowon
ॲग्रो विशेष

Fodder Depot : चारा डेपोसाठी प्रशासनास शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा

Demand for Fodder Depot : सातारा जिल्ह्यात चाऱ्याचीही कमतरता भासू लागली आहे. आतापर्यंत कोरेगाव व फलटण तालुक्यातून चारा डेपोसाठी मागणी झाली आहे.

Team Agrowon

Satara News : पाणीटंचाईबरोबरच आता जिल्ह्यात चाऱ्याचीही कमतरता भासू लागली आहे. आतापर्यंत कोरेगाव व फलटण तालुक्यातून चारा डेपोसाठी मागणी झाली आहे. याबाबतचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडे पाठविण्यात आला आहे;

पण चारा डेपो की छावण्या सुरू करण्याबाबत अद्याप शासनाकडून कोणतीही सूचना आलेली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासन शासनाच्या आदेशाच्या प्रतीक्षेत आहे.

जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागला असून, सर्वच तालुक्यांत पाणीटंचाई जाणवू लागली आहे. अनेक गावांत एक दिवसाआड पिण्याचे पाणी सोडले जात आहे. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाई अधिक गंभीर होण्याची भीती आहे.

दुष्काळी भागाला पाणी देणाऱ्या धरणांत ही निम्म्यापेक्षा कमी पाणी उपलब्ध आहे. सध्या कृषी विभागाने चाराटंचाईवर पर्याय म्हणून चारा लागवडीला प्राधान्य दिले आहे. दुष्काळी भागात पाणी सोडल्यामुळे तेथे चारा लागवडीवर भर देण्यात आला आहे. आतापर्यंत सव्वालाख हेक्टरवर चारा लागवड झाली आहे.

शासनाकडून चारा डेपोसाठी परवानगी मिळाल्यानंतर असे डेपो चारा मागणी होणाऱ्या ठिकाणी केली जाणार आहे. सध्या जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे, वाठार स्टेशन येथे, तर फलटण तालुक्यातून चारा डेपोची मागणी झाली आहे. यापूर्वी माण व खटाव तालुक्यांतूनही चारा डेपोची मागणी झाली होती.

चाऱ्यासाठी ५० लाखांचे बियाणे वितरित

पशुसंवर्धन विभागाने चारा निर्मितीसाठी ५० लाख रुपयांचे बियाण्याचे वितरण केले आहे. कृषी विभागाने वैरणीसाठी रब्बी ज्वारी व मका लागवडीवर भर दिला आहे. १४ हजार ८४ हेक्टर क्षेत्रावर मका लागवड, तर एक लाख तीन हजार ३९५ हेक्टरवर रब्बी ज्वारी आहे. यातून ४२ हजार २५४ मेट्रिक टन मक्याचा चारा, तर ५१ हजार ६९८ मेट्रिक टन रब्बी ज्वारीचा चारा मिळेल.

जिल्ह्यातील तीन ठिकाणी चारा डेपोची मागणी आहे. त्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून शासनाला पाठविला आहे. शासनाकडून निर्णय झाल्यानंतर तातडीने चारा डेपो सुरू होतील.
जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी, सातारा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Commodity Futures: वायदे बाजाराचे वावडे का?

Congress Protest: शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेसची आज धाराशिवला संघर्ष न्याययात्रा

Pune Agri College Issue: कृषिमंत्री, कुलगुरूंकडून आरोग्य केंद्राकडे दुर्लक्ष?

Onion Farmer Protest: समितीच्या नाकाने ‘कांदे’ सोलण्याचा सरकारचा उपद्‍व्याप

Rural Employment Opportunities: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे ग्रामीण युवकांसाठी रोजगार संधी

SCROLL FOR NEXT