Monsoon Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Vidharbha Rain : विदर्भात पावसाने गाठली सरासरी

Monsoon Rain : पावसाने नागपूरसह विदर्भातही सरासरी गाठली आहे.

Team Agrowon

Nagpur News : उपराजधानीत गेल्या दीड महिन्यात जेवढा पाऊस पडला नाही, त्यापेक्षा अधिक पाऊस मागील दोन दिवसांत बरसला आहे. त्यामुळे पावसाने नागपूरसह विदर्भातही सरासरी गाठली आहे.

जून आणि जुलैचा पहिला पंधरवाडा कोरडा गेल्यानंतर मॉन्सून विदर्भात पुन्हा सक्रिय झाला आहे. गेल्या दिवसांत वरुणराजाने नागपूर व विदर्भावर चांगलीच कृपा केली आहे. मागील ४८ तासांत शहरात तब्बल २६१ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. उल्लेखनीय म्हणजे, यातील बहुतांश पाऊस शनिवारी पहाटे साडेपाच ते दुपारी साडेअकरा या सहा तासांतील आहे.

पावसाळा सुरू झाल्यापासून नागपुरात १ जून १५ जुलैपर्यंत दीड महिन्यात केवळ १९८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. आतापर्यंत ५१९ मिलिमीटर पाऊस बरसल्याने सरासरीही पार झाली आहे. विदर्भाचा विचार केल्यास, अकरा जिल्ह्यांमध्ये २० जुलैपर्यंत एकूण ४०९ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली, जी सरासरी (३७२ मिलिमीटर) पावसाच्या १० टक्के अधिक आहे.

नागपूरची जुलैमधील आकडेवारी

जुलैमधील सरासरी पाऊस - ३४७.७ मिलिमीटर

महिन्यातील सर्वाधिक पाऊस- ६७८.९ मिलिमीटर (१९९४ मध्ये)

२४ तासांत सर्वाधिक पाऊस- ३०४ मिलिमीटर (१२ जुलै १९९४)

दशकातील मासिक पाऊस

वर्ष एकूण पाऊस

२०१४ ३२७.९ मिमी

२०१५ ६२८.७ मिमी

२०१६ ४०५.४ मिमी

२०१७ ३२४.७ मिमी

२०१८ ५४३.५ मिमी

२०१९ ४३९.९ मिमी

२०२० ३७८.६ मिमी

२०२१ ४२०.४ मिमी

२०२२ ६२८.७ मिमी

२०२३ ५१६.२ मिमी

२०२४ आतापर्यंत ३७८ मिमी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT