Devgad Hapus agrowon
ॲग्रो विशेष

Devgad Hapus Unique Code : अस्सल देवगड हापूसवर आता ‘युनिक कोड’; बागायतदारांचा दर्जा राखण्यासाठी निर्णय

Devgad Mango : युनिक कोडचा बनावट वापर होऊ नये, यासाठी शेतकऱ्याना त्यांची तालुक्यातील आंबा कलमे त्यांच्या ७-१२ उताऱ्यावर तपासून आणि त्यांची उत्पादन क्षमता बघून तितकेच कोड मिळणार आहेत.

sandeep Shirguppe

Authentic Devgad Hapus : अस्सल देवगड हापूस आंबा खरेदीदार ग्राहकांची वारंवार फसवणूक होत असते. ही फसवणूक टाळण्यासाठी आणि देवगड हापूसचा दर्जा अबाधित राखण्यासाठी आता प्रत्येक हापूस आंब्याला युनिक कोड देण्यात येणार आहे. हा निर्णय देवगड आंबा उत्पादक सहकारी संस्थेने घेतला. जामसंडे येथे गुरूवारी (ता.०२) झालेल्या चर्चासत्रात आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आला. याबाबतची माहिती देवगड आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. अजित गोगटे यांनी दिली.

अध्यक्ष गोगटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "युनिक कोड आंबा उत्पादक संस्थेमार्फत वितरित केले जाणार आहेत. युनिक कोडचा बनावट वापर होऊ नये, यासाठी शेतकऱ्याना त्यांची तालुक्यातील आंबा कलमे त्यांच्या ७-१२ उताऱ्यावर तपासून आणि त्यांची उत्पादन क्षमता बघून तितकेच कोड मिळणार आहेत. असे कोड मिळण्यासाठी प्रत्येक शेतकरी जीआयधारक असायला हवा. आंब्यासाठी वापर होण्याचे हे पहिले वर्ष असल्याने या कोडचे स्टिकर छापून तयार होण्यासाठी आणि त्यांची यंत्रणेमध्ये नोंद होण्यासाठी ४५ दिवस लागणार आहेत. त्यामुळे १० जानेवारीपर्यंत शेतकऱ्यानी संस्थेकडे नोंदणी करावी". अशी माहिती गोगटे यांनी दिली.

"जीआय कायद्याने प्राप्त होणारे अधिकार वापरून आता देवगड हापूसच्या नावाने विकल्या जाणाऱ्या प्रत्येक आंब्यावर युनिक कोड असणे बंधनकारक करण्यात येणार आहे. त्यासाठी असे युनिक कोडचे पेटंट मिळालेल्या मुंबईस्थित एका कंपनीबरोबर संस्थेने करार केला आहे." असे अ‍ॅड. गोगटे यांनी सांगितले.

युनिक कोडच्या निर्मीतीमुळे देवगड हापूसच्या नावाखाली होणाऱ्या बनावट आंबा विक्रीला पायबंद घालण्यात मोठा हातभार लागणार आहे. सध्या हापूस आंब्याला जीआय मानांकन ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या पाच जिल्ह्यांसाठी मिळालेले आहे. परंतु, बाजारात देवगड हापूसला पसंती असल्यामुळे देवगड हापूससाठी स्वतंत्र जीआय मिळावा, अशी मागणी देवगडच्या आंबा उत्पादकांनी केली आहे.

देवगडच्या शेतकऱ्यांना आपली फसगत झाल्याचे जाणवत आहे. त्यामुळे देवगड हापूसच्या स्वतंत्र जीआयसाठी संस्थेने प्रयत्न करावे, अशी मागणी देवगड हापूस आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी केली. या मागणीला प्रतिसाद देऊन देवगड हापूसच्या स्वतंत्र जीआयसाठी पावले उचलण्याचा आणि एकत्रित हापूसच्या जीआयमधून बाहेर पडण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचा निर्णय चर्चासत्रात घेण्यात आला.

यावेळी अ‍ॅड. गोगटे यांच्यासह उपाध्यक्ष डी. बी. बलवान, माजी अध्यक्ष सुधीर जोशी, व्यवस्थापक संतोष पाटकर, जीआय तज्ज्ञ ओंकार सप्रे, युनिक कोड व्यवस्था तज्ज्ञ प्रशांत यादव तालुका कृषी मंडळ अधिकारी ऋषिकेश उलपे, तालुक्याच्या विविध भागांतील आंबा बागायतदार, आंबा विक्रेते आणि शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Nagar Parishad Nagar Panchayat Elections Result: मतदारांचा कौल कुणाला?; मतमोजणीला सुरुवात

Modi Epstein Controversy: नरेंद्र मोदी आणि एपस्टीन यांचे नाते काय?: चव्हाण

MFOI Award 2025: अमृतालयम ‘एफपीओ’ ला राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार

Birth Records: दीड हजार लोकवस्तीच्या गावात २७ हजार जन्म नोंदी

Farmer Issue: ‘जाचक अटी दूर करून कापूस, सोयाबीन खरेदी करा’

SCROLL FOR NEXT