Bori Market Committee Chairman Agrowon
ॲग्रो विशेष

Bori Market Committee : बोरी बाजार समितीच्या सभापतिपदी आत्माराम पवार

Team Agrowon

APMC Parbhani News : बोरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी भारतीय जनता पक्षप्रणीत पॅनेलचे आत्माराम पवार यांची तर उपसभापतिपदी यशवंत चौधरी यांची बुधवारी (ता. २४) बहुमतांनी निवड झाली.

बोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पहिल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षप्रणीत पॅनेलने १८ पैकी १२ जिंकत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. महाविकास आघाडी पॅनेलला ६ जागा मिळालेल्या आहेत.

सभापती, उपसभापती निवडीसाठी बुधवारी (ता. २४) सकाळी ११ वाजता पीठासीन अधिकारी नायब तहसीलदार परेश चौधरी यांच्या अध्यक्षेत बाजार समिती सभागृहामध्ये नवनिर्वाचित संचालक मंडळाची विशेष सभा सुरू झाली.

विहित कालावधीत सभापतिपदासाठी भाजपचे आत्माराम पवार व महाविकास आघाडीचे नंदकुमार अंभुरे यांनी, तर उपसभापतिपदासाठी भाजपचे यशवंत चौधरी व महाविकास आघाडीचे मोबीन कुरेशी यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. कुणीही माघार न घेतली नाही.दोनही पदांसाठी हात वर करून मतदान घेण्यात आले.

सभापतिपदासाठी पवार यांना १२, तर अंभुरे यांना ६ मते मिळाली. उपसभापतिपदासाठी चौधरी यांना १२, तर कुरेशी यांना ६ मते मिळाली. पीठासीन अधिकारी परेश चौधरी यांनी सभापतिपदी आत्माराम पवार यांची तर उपसभापतिपदी यशवंत चौधरी यांची निवड झाल्याचे जाहीर केले.

या वेळी नवनिर्विचत संचालक सुरेश खिस्ते, चंद्रकांत चौधरी, वहीदखान पठाण, प्रभाकर पुंड, हनुमान सोमानी, इंद्राबाई तिथे, झुमराबाई देशमुख, गोविंद खैरे, लक्ष्मीकांत कानडे, आनंदराव देशमुख, नंदकुमार अंभुरे, मोबीन कुरेशी, स्नेहा वाघीकर, विश्‍वंभर पवार, संतोष चौधरी, सुदाम नितनवरे उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित सभापती उपसभापती व संचालकांचा सत्कार करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT