Agriculture University Agrowon
ॲग्रो विशेष

Government Scheme : आश्वासित प्रगती योजना बाराशेवर कर्मचाऱ्यांना लागू

Dr. P.G. Patil : आश्वासित प्रगती योजना महात्मा फुले कृषी विद्यापीठातील बाराशेपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना सुधारितपणे लागू केली आहे, असे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील यांनी सांगितले.

Team Agrowon

Nagar News : एक तप उलटूनही प्रलंबित असलेली आश्वासित प्रगती योजना महात्मा फुले कृषी विद्यापीठातील बाराशेपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना सुधारितपणे लागू केली आहे, असे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील यांनी सांगितले.

राज्यातील ‘क’ व ‘ड’ वर्ग कर्मचाऱ्‍यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नसल्याने दोन लाभांची (१२ व २४ वर्ष) कृषी विद्यापीठातील ‘क’ व ‘ड’ वर्गातील कर्मचारी या लाभापासून आजपर्यंत वंचित होते. गेल्या १३ वर्षांपासून राज्यातील कृषी विद्यापीठांचे कर्मचारी आश्वासीत प्रगती योजना लागू करण्यासाठी मागणी करत होते.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शासनाकडे ही मागणी मांडली होती. शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन तसा शासन निर्णय मंजूर केला आहे. या अनुषंगाने कुलगुरु डॉ. पाटील यांनी ‘क’ व ‘ड’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन आश्वासीत प्रगती योजना आजच्या तारखेपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येणार असल्याचे सांगितले.

बैठकीला नियंत्रक सदाशिव पाटील, कुलसचिव डॉ. विठ्ठल शिर्के, उप-कुलसचिव (प्रशासन) विजय पाटील, सहाय्यक कुलसचिव (प्रशासन) सुनिल आव्हाड, कार्यालय अधिक्षक (प्रशासन) वसंत अडसूरे, विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील दहा जिल्ह्यांतील ‘क’ व ‘ड’ वर्ग कर्मचारी उपस्थित होते.

प्राध्यापकांची १० वर्षांपासून प्रलंबित असलेली अश्वासीत प्रगती योजना लागू केली व त्याचा ७० प्राध्यापकांना फायदा झाला आहे. ही योजना सुरु करण्यासाठी सातत्याने मागणी केली होती. त्याचा फायदा झाला.
डॉ. पी. जी. पाटील, कुलगुरु, महात्मा फुले कृषी विद्यापीठ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

Akola Heavy Rainfall: अकोला जिल्ह्यात सर्वदूर मॉन्सून पावसाची दमदार हजेरी

Seed Ball Making: सीड बॉल निर्मितीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Marathwada Rain 2026: छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील ९ मंडलांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT