Dhananjay Munde Agrowon
ॲग्रो विशेष

Dhananjay Munde : अतिवृष्टी बाधितांना निकषांपलीकडे मदत देऊ : कृषिमंत्री धनंजय मुंडे

Farmer Help : बाधित शेतकऱ्यांच्या पदरात जास्तीत जास्त आर्थिक मदत पडावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत, अशी ग्वाही कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

Team Agrowon

Parbhani News : अतिवृष्टीमुळे परभणीसह मराठवाड्यातील बीड, नांदेड आदी जिल्ह्यांतील पिकांसह जमिनी खरडून गेल्या. शेतकऱ्यांचे अभूतपूर्व नुकसान झाले आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना एनडीआरएफ व एसडीआरएफच्या निकषांपलीकडे मदत देण्याचा शासनाचा प्रयत्न राहील. बाधित शेतकऱ्यांच्या पदरात जास्तीत जास्त आर्थिक मदत पडावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत, अशी ग्वाही कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

कृषिमंत्री मुंडे यांनी बुधवारी (ता. ४) परभणी जिल्ह्यातील काष्टगाव, एकरुखा (ता. परभणी), कोल्हा (ता. मानवत), ढेंगळी पिपळगाव (ता. सेलू), रेणापूर, बोरगव्हाण, खेर्डा (सर्व ता. पाथरी) येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

काष्टगाव (ता. परभणी) येथील नुकसानीची पाहणीस आले असता श्री. मुंडे यांना अतिवृष्टीमुळे वाळलेल्या कपाशीचे झाड देऊन स्वागत करण्यात आले. बाधित शेतकऱ्यांना तत्काळ सरसकट एनडीआरएफ, एसडीआरएफच्या निकषानुसार मदत करावी. पीकविमा कंपनीला अग्रिम विमा रक्कम देण्यासाठी आदेशित करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

श्री. मुंडे म्हणाले, की परभणी जिल्ह्यातील सर्व मंडलांतील शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम विमा रक्कम देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिसूचना काढावी. वीज नाही. नेटवर्क नसल्यामुळे मोबाइलवर ऑनलाइन तक्रारी करणे शक्य नाही. त्यामुळे ऑफलाइन तक्रारी स्वीकारण्याचे आदेश काढण्याबाबत सूचना केल्या आहेत. पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. या वेळी आमदार राजेश विटकेर, आमदार मेघना बोर्डीकर आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT