Agriculture Work Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : पावसाची उसंत, शेतीकामांनी घेतला वेग

Khandesh Rain News : खानदेशात गेले काही दिवस पावसाने उसंत घेतली आहे. सकाळी कोरडे दुपारी ढगाळ वातावरण, अशी स्थिती असते.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात गेले काही दिवस पावसाने उसंत घेतली आहे. सकाळी कोरडे दुपारी ढगाळ वातावरण, अशी स्थिती असते. सूर्यदर्शन अधूनमधून होत असून, कापूस पिकात फवारणी, तणनियंत्रण आदी कामे हलक्या, मध्यम जमिनीच्या भागात सुरू आहेत. =

मध्यंतरी १० ते ११ २५ दिवस सतत पाऊस, ढगाळ वातावरण होते. यामुळे कापूस वेचणी, तणनियंत्रण, फवारणी, काढणी, मळणीची कामे ठप्प झाली होती. यातच मागील काही दिवस पावसाने उसंत घेतल्याने शेतकऱ्यांनी कमी वाफशातदेखील कापूस वेचणी, फवारणीची कामे हाती घेतली आहेत. तणनियंत्रणदेखील हलक्या, मध्यम जमिनीत सुरू झाले आहे.

शेतकरी कोरड्या, स्वच्छ सूर्यप्रकाशीत वातावरणाची प्रतीक्षा गेले अनेक दिवस करीत होते. प्रतिकूल वातावरणामुळे मजुरांनादेखील काम नव्हते. पण वातावरण अनुकूल होत असल्याने एकाच वेळी कापूस पिकात फवारणी, तणनियंत्रण आदी कामे शेतकऱ्यांनी हाती घेतली आहेत. यामुळे मजूरटंचाई जाणवू लागली आहे. अनेक भागात उडीद, सोयाबीन, कापूस पिकाची हानी झाली आहे. पण हलक्या, उताराच्या, माथ्यावरील जमिनींमध्ये पीकस्थिती बरी आहे.

पूर्वहंगामी व पाच जूनपर्यंत लागवड केलेल्या कापूस पिकात बोंडे उमलण्याची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत. पीक वेचणीला येईल, अशी अपेक्षा आहे. १८० ते २०० रुपये रोज, अशी मजुरी शेतकरी मजुरांना देत आहेत. काही मजूर सातपुडा पर्वत भागातून खानदेशात दाखल झाले होते. ही मजूर मंडळी पेरणीसाठी आपल्या गावी परतली होती. परंतु गणेशोत्सवाच्या काळात मजूर सातपुड्यातून अन्य भागात दाखल होतील, याची अपेक्षा आहे.

पण सध्या मजूरटंचाई जाणवत आहे. केळी काढणीलाही वेग आला आहे. मध्यंतरी फक्त मुख्य मार्गांवरील किंवा डांबरी, पक्क्या रस्त्यांवरील केळी बागांमध्ये जळगाव, चोपडा, पाचोरा-भडगाव भागात काढणी सुरू होती. पण वातावरण कोरडे होत असल्याचे दिसताच शिवारातही काढणीसाठी ट्रक, मोठी वाहने पोचू लागली आहेत.

उडदाच्या मळणी आणखी १० ते १५ दिवसानंतर

काही भागात मूग, उडीद मळणीवर येत आहे. उडदाची मळणी आणखी १० ते १५ दिवसानंतर गतीने सुरू होईल. तूर पिकात शेतकरी फवारणी घेत आहेत. तसेच भाजीपाला पिकांमध्ये तणनियंत्रण खते देण्याचे कामही सुरू झाल्याचे दिसत आहे. पुढे पाऊस नसल्यास शेतीकामे व्यवस्थित होतील, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Custard Apple Production: सेंद्रिय खतामुळे सीताफळाचे भरघोस उत्पादन

Maratha Reservation: मुंबईला जाणार, आरक्षण घेऊनच परतणार : मनोज जरांगे

Agricultural Relief: संततधार पावसाने बटाटा पिकाला जीवदान

E Peek Pahani: खरीप ई-पीक पाहणीचे ‘तीन तेरा’

Modi Government Criticism: भाजपची आता ‘सत्ताचोरी’ची तयारी : मल्लिकार्जुन खर्गे

SCROLL FOR NEXT