PM Kisan  Agrowon
ॲग्रो विशेष

PM Kisan : 'पीएम किसान'मध्ये लाभार्थ्यांची संख्या ७६ लाखांनी वाढली ; सरकारवर अतिरिक्त ३ हजार कोटींचा बोजा

PM Kisan 16th Installment : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (पीएम किसान) केंद्र सरकार लवकरच दोन हजार रुपयांचा १६ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे.

Mahesh Gaikwad

PM Kisan Latest Update : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (पीएम किसान) केंद्र सरकार लवकरच दोन हजार रुपयांचा १६ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते २८ फेब्रूवारील महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यातून हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.

मात्र, यंदाचा हप्ता वितरित करताना सरकारला अतिरिक्त तीन हजार कोटी रुपये खर्च करावे लागणार आहे. योजनेतील लाभार्थ्यांच्या संख्येत ७६ लाख शेतकऱ्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारवर अतिरिक्त रक्कमेचा बोजा पडणार आहे.

शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक मदत म्हणून पीएम किसान योजना केंद्र सरकारद्वारा राबविली जात आहे. या योजनेंतर्गत सरकार दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करते. आतापर्यंत या अंतर्गत शेतकऱ्यांना १५ हप्त्यांमध्ये योजनेची रक्कम वितरित करण्यात आली आहे. लवकर पंतप्रधान मोदी योजनेच्या १६ व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करणार आहेत.

१० दिवसांत जोडले ७६ लाख शेतकरी

पीएम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार, योजनेचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहचावा यासाठी १२ ते २१ फेब्रूवारी या कालावधित संपर्क अभियान राबविण्यात आले. या अभियानादरम्यान ७६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना योजनेशी जोडण्यात आले.

ज्या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झाली नव्हती तसेच काही कारणांमुळे लाभार्थी शेतकरी योजनेतून बाहेर पडले होते, अशा शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. या अभियानअंतर्गत १० दिवासांत योजनेसाठी पात्र असूनही हप्ता रोखण्यात आला आहे, अशा शेतकऱ्यांची ई-केवायसी करण्यात आली. आता या शेतकऱ्यांना पुढचा हप्ता थेट खात्यात जमा केला जाणार आहे.

लाभार्थ्यांची संख्या ९ कोटी पार

योजनेचा १६ वा हप्ता पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते ऑनलाईन पध्दतीने वितरित करण्यात येणार आहे. या अंतर्गत ९ कोटीहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात २१ हजार कोटींहून अधिकची रक्कम हस्तांतरित केली जाणार आहे.

यापूर्वीच्या १५ वा हप्ता १५ नोव्हेंबर २०२३ ला शेतकऱ्यांना देण्यात आला होता. त्यावेळी ८.११ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८.६१ हजार कोटींची रक्कम जमा करण्यात आली होती. १६ वा हप्ता वितरित करताना लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्याने सरकारवर अतिरिक्त तीन हजार कोटींचा बोजा पडणार आहे.

दरम्यान, पीएम किसान ही योजना २०१९ मध्ये सुरू करण्यात आली. यावर्षी या योजनेला पाच वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या पाच वर्षांच्या काळात योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांना वार्षिक सहा रुपयांची आर्थिक मदत केली जात आहे. योजनेतंर्गत आतापर्यंत ११ कोटींहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात २.८१ लाख कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत ८ निर्णयांना मान्यता; राज्यात १० उमेद मॉल उभारण्यात येणार

Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा तूर्तास टळला?

Crop Insurance : मराठवाड्यात केवळ १२ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

Agricultural Scheme: शेतकऱ्यांनो, ट्रॅक्टरसह कृषी अवजारांसाठी सरकारकडून ५० टक्क्यांपर्यंत अनुदान

Soybean Pest Control : सोयाबीन पिकावरील चक्रीभुंग्यांचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT