Salam Kisan Agrowon
ॲग्रो विशेष

Salam Kisan: भिसीमध्ये `सलाम किसान`कडून तब्बल १००० माती नमुन्यांचे परीक्षण 

शेतकर्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी ड्रोन फवारणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांना ड्रोनचे फायदे समजावून सांगण्यात आले.

Team Agrowon

Chandrapur : भिसी (ता. चिमूर, जि. चंद्रपूर) येथे सलाम किसान समुहाकडून १० मार्च रोजी मोफत माती परीक्षण व ड्रोन फवारणी प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते.

केवळ ९० सेकंदात माती परीक्षण करण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात आले. त्याला शेतकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. 

तसेच शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी ड्रोन फवारणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांना ड्रोनचे फायदे समजावून सांगण्यात आले.

ड्रोनमुळे वेळ, कष्ट यासोबत आर्थिक बचतही होते, याबद्दल माहिती देण्यात आली. 

`सलाम किसान`ने भिसी परिसरात एक हजारांपेक्षा जास्त माती नमुन्यांचे मोफत परीक्षण करण्याचा टप्पा पार केला. 

कपरला आणि बोरगाव (बुटी) यासारखी छोटी गावेसुद्धा या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आली. 

`सलाम किसान`ने दोन वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल लावले होते. एक स्टॉल बस स्थानकावर होता, तर दुसरा भिसी येथील बाजारपेठेच्या ठिकाणी होता. 

शेतकऱ्यांना माती परीक्षणाची गरज आणि फायदे याबद्दल जागरूक करण्यात आले. माती परीक्षणाबाबतची तांत्रिक माहिती आणि ९० सेकंदात माती परीक्षण करण्याचे तंत्र याबद्दल शेतकऱ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. 

सलाम किसान समूहाकडून शेतकऱ्यांसाठी कृषी तंत्रज्ञानविषयक विविध सेवा आणि उपक्रम राबविले जातात. 

तसेच भिसी परिसरात स्वयंसेवकांनी एकनाथी भागवत सप्ताहात स्वयंसेवा आणि अन्न वाटपासाठी सहभाग घेतला.

यंदा सप्ताहामध्ये ह.भ.प. नरेशजी निंबेकर महाराज आणि त्याचा संच होता. त्यांनी मंचावरून सलाम किसान टीमच्या प्रयत्नांचे कौतुक केले. 

१२ ते १९ मार्च या कालावधीत भिसी येथील सलाम किसान स्टॉलला अनेक शेतकऱ्यांनी भेट देऊन माहिती घेतली. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT