रेशीम उद्योग Agrowon
ॲग्रो विशेष

Sericulture Industry : शेतीला जोडधंदा म्हणून रेशीम शेती उद्योग पर्याय ठरावा

Mahareshim Abhiyan : पालघर जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना उत्पन्नाचे नवीन साधन मिळावे, शेतीला जोडधंदा म्हणून रेशीम शेती उद्योग पर्याय ठरावा, यासाठी जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत महारेशीम अभियान राबवण्यात येत आहे.

Team Agrowon

Mumbai News : तुती लागवड हे शाश्वत उत्पन्न देणारे पीक आहे. एका तुतीची लागवड केल्यास ती १५ ते २० वर्षे टिकते. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना उत्पन्नाचे नवीन साधन मिळावे, शेतीला जोडधंदा म्हणून रेशीम शेती उद्योग पर्याय ठरावा, यासाठी जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत महारेशीम अभियान राबवण्यात येत आहे.

तुतीची लागवड पाण्याचा निचरा होणाऱ्या कोणत्याही जमिनीत करता येते. अन्य बागायती पिकापेक्षा तुती बागेस कमी पाण्याची आवश्‍यकता भासते. तुती रोपे व अंडीपुंज सवलतीच्या दरात पुरवठा केली जातात. तुती बागेस कीटकनाशके, बुरशीनाशके, फवारणी खर्च करावा लागत नाही. उत्पादित केलेल्या रेशीम कोषास सरकारची बाजारपेठही उपलब्ध आहे.

रेशीम कोषाची वाहतूक अन्य उत्पादनाच्या तुलनेत कमी कष्टात व कमी खर्चात होते. एकदा तुतीची लागवड केल्यानंतर १५ वर्षांपर्यंत पुन्हा लागवड करावी लागत नाही. शास्त्रोक्त पद्धतीने कीटक संगोपन केल्यास दुसऱ्या वर्षापासून वार्षिक किमान एक लाखापर्यंत उत्पन्न मिळते.

तुती झाडाच्या पाला नसलेला फांद्यांचा तुती बेणे म्हणून जनावरांना खाद्य, झोपडीचे कुंपण, अळ्यांचे रॅक बनवणे, कंपोस्ट खत तयार करणे आदीकरिता वापर होतो. मोरी कल्चर - तुतीच्या पानांची लागवड, रेशीम किड्यांचे संगोपन, रेशीम किड्यांच्या वाढीस चालना देणे. रेशीम रीलिंग - रेशीम किड्यांच्या कोकूनमधून रेशीम तंतू काढणे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत रेशीम कोष उत्पादन योजना येत आहेत.

बंदिस्त ठिकाणी काम

किड्यांचे संगोपन बंदिस्त घरात करावयाचे असल्यामुळे अन्य पिकासारखे मेहनतीचे काम करावे लागत नाही. कीटक संगोपन म्हणजे अळ्यांना पाला खाऊ घालणे, हे कमी कष्टाचे काम असल्यामुळे घरातील स्त्रिया, माणसे, मुले चांगल्या प्रकारे करू शकतात, त्यामुळे मजुरी खर्चात बचत होते.

सहा लाखांपर्यंत अनुदान

महारेशीम नाव नोंदणी अभियान व जिल्हा रेशीम कार्यालयाच्या योजनेअंतर्गत, रेशीम शेती प्रक्रियेत तीन प्राथमिक पायऱ्या असतात. सरकारकडून शेतकऱ्याला प्रतिलाभार्थी एक एकरसाठी शेड, साहित्य व कामकाज मजुरीसाठी तीन वर्षांकरिता एकत्रित अनुदान तीन लाख ९७ हजार रुपये, तर तुती लागवडीसाठी एक लाख ८६ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.

रेशीम शेतीमुळे ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती होते. त्यामुळे युवकांचे नोकरीकरिता शहरी भागाकडे जाणे रोखले जाऊ शकते. सरकारमार्फत रेशीम शेती उद्योग मोफत प्रशिक्षण व अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले जाते. तुती लागवड करून कीटक संगोपन गृह बांधून कोष उत्पादन घेतल्यास मजुरी व साहित्य अर्थसाह्य उपलब्ध करून देण्यात येते.
विनायक पवार, प्रकल्प संचालक, आत्मा
पालघर जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभल्यामुळे आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे. तुती लागवडीसाठी आर्द्रतेचे प्रमाण पोषक असूनदेखील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत पालघरमध्ये तुती लागवडीचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जागृत होऊन तुती लागवडीकडे वळावे.
प्रणिता संख्ये, जिल्हा रेशीम अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

Agriculture Admission 2026: कृषी शिक्षण प्रवेशासाठी दुसऱ्या फेरीला सुरुवात

Farmer Children Protest: एकरकमी एफआरपीसाठी शेतकरी पाल्यांचे आंदोलन

Prof. Yasmin Sheikh Dies: ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांचे निधन

SCROLL FOR NEXT