Savitribai Phule
Savitribai Phule Agrowon
ॲग्रो विशेष

Savitribai Phule : कर्तृत्वाने झाली ती सावित्रीची क्रांतिज्योती

Team Agrowon

ज्योती आधाट-तुपे, ९४२०९५००७५

आपले संपूर्ण जीवन समाजाच्या निःस्वार्थ सेवेसाठी वेचणाऱ्‍या, पहिल्या भारतीय यशस्वी मुख्याध्यापिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला. बालपणीची सावित्री ही धाडसी, अवखळ व निर्भय होती.

विहिरीत पोहणे, झाडावर चढणे यात त्या तरबेज होत्या. जोतीराव-सावित्रीबाई यांचे लग्न १८४० मध्ये नायगावी पार पडले. स्त्रीशिक्षणाचे बीज इथेच रोवायचे होते म्हणूनच या विवाहानंतर एका ऐतिहासिक पर्वाचा प्रारंभ होतो. आधुनिक स्त्रीशिक्षणाच्या (Women Education) इतिहासाचा पाया घरापासूनच रचला गेला.

शिक्षणाचे धडे गिरवले जोतिबा संग

मुलींचे शिक्षण व्रत हाती घेतले होते तिनं

जोतिबांकडून धूळपाटीवर सुरुवातीला सावित्रीबाईंनी शिक्षण घेतले. मुलींना शिकवणे ही संकल्पनाच खूप क्रांतिकारी होती. कारण एक मुलगी शिकली, की ती दोन घरांमध्ये ज्ञानाची ज्योत लावते आणि स्त्री शिकली की संपूर्ण घराचा विकास होतो. त्या काळात मुलींच्या शिक्षणाला विरोध असतानाही जोतिबा आणि सावित्रीमाईंनी या अडथळ्याला सुसंधी मानली. संघर्षावर ज्ञानाचा असा घाला घातला, की प्रगतीच्या वाटा विस्तारल्या गेल्या.

चिखलाचे गोळे झेलले होते सावित्रीनं...

यशवंतास दत्तक घेऊन

केले मातृधर्म रक्षण...

क्षमाभाव किती दाखवावा. बोलण्याऐवजी हे कृतीतून दाखवणाऱ्या माई आज क्षणोक्षणी आपणा सर्व महिलांसाठी प्रेरणेचा स्रोत आहेत. छोट्या छोट्या संकटाने आपल्याला कोलमडल्यासारखं होतं. आई बोलली, की मुलगी रुसते. शिक्षक रागावले तरीही अपमान वाटतो. समाजाकडून दुखावल्या गेल्यावर तर विचारायलाच नको, इतके हाल आपले होतात. मग आठवा तो काळ. काय वाटलं असेल

सावित्रीमाईंना... ज्या समाजासाठी समर्पित भावनेनं ती जगत होती, तो समाज तिला चहूदिशांनी त्रास देत होता. तिच्या भावना जरूर दुखावल्या जात होत्या, पण जोतिबांची साथ खूप मोठी होती.

त्या काळी सोपे नव्हते, स्त्रियांचे शिक्षण...

विधवा पुनर्विवाह, आणला हो घडवून...

सावित्रीबाई फुले यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व अभ्यासताना अनेक लेखकांनी माईंचे सुंदर शब्दांत वर्णन केलंय. परस्परांवरील विश्‍वास, त्यातून निर्माण होणारे प्रेम हे वैवाहिक जीवनाच्या यशाचे गमक आहे. सावित्रीमाता एक समंजस कन्या, कर्तव्यदक्ष सहधर्मचारिणी, प्रेमळ माता व मायाळू सासू अशा चारही भूमिका सावित्रीबाईंनी अत्यंत कार्यक्षमतेने पार पाडल्या. सावित्रीबाईंच्या प्रत्येक कृतीत सागराचे गांभीर्य व हिमालयाची उत्तुंगता होती.

भारतात केलं तिनं, स्त्रीमुक्तीचे आंदोलन

जोतिबांची साथ तिला, स्त्री-पुरुष समान...

आजच्या समाजव्यवस्थेलाही मागे पाडेल अशी स्त्रियांच्या शिक्षणाबाबत आणि एकंदरीत जीवनाबाबत जोतिबांची भूमिका होती. समाजासाठी खूप मोठी व्यापकता आणि सकारात्मकता विचारांसोबत कृतीतही भिनलेली होती. जोतिबा आणि सावित्रीमाई यांचे आपण कितीही ऋण मानले तरीही कमीच आहेत. कारण त्या काळात केलेले स्त्रीशिक्षण विषयक विचार अन् कृतीमुळे आपण आजच्या मुली, स्त्रिया ताठ मानेने आपापल्या कार्यक्षेत्रात आपला ठसा उमटवत आहोत.

सावित्रीबाईंच्या व्यक्तिमत्त्वात शारीरिक सौंदर्यापेक्षा गुणात्मक सौंदर्याला अधिक महत्त्व आहे. त्या सतत हसतमुख असायच्या. त्यांनी विद्यादान तर केलेच. परंतु तितकेच अन्नदानही केले. कोणी आपल्याला मोठं म्हणेल आपले नावलौकिक होईल, असे त्यांना दोघांनाही कधीच वाटले नाही. स्त्रीमुक्ती आंदोलनात त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह, अनाथ बाल-बालिकाश्रम सुरू केले. स्त्री संघटन कार्याची स्थापना केली. विधवा विवाह याबाबत हृदयपरिवर्तनासाठी प्रयत्न केले. १८५४ मध्ये त्यांचा पहिला काव्यफुले हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला.

सावित्रीबाई उत्तम शिक्षिका, आदर्श मुख्याध्यापिका, समाजसेविका, कवयित्री, लेखिका तर होत्याच, त्यासोबत त्या एक सर्वोत्तम वक्त्याही होत्या. देशाचे वर्तमान आणि उज्ज्वल भविष्याबाबत त्या खूप कणखर अशा भाषेमध्ये बोलायच्या.

त्यांची मते ही स्पष्ट असायची. सत्यशोधक समाजासाठी माईंनी जोतिबांसमवेत आणि ते गेल्यानंतरही खूप कष्ट घेतले. सावत्रीमाईंकडून आपण आज नेमकं काय शिकायचं ,तर त्यांचा कणखर बाणा, जगण्यातली शिस्त, कोणतेही काम करण्याची हातोटी, समाजासाठी आत्मीयतेने आणि निडरपणे कार्य करत राहणे.

अध्यापन कार्य करीत असताना काही लोक त्यांचा छळ करायचे. अशा प्रसंगी त्यांना माई उत्तर देत असत, की माझ्या लहान- थोर बंधूंनो, मी आपल्या धाकट्या भगिनींना शिकवण्याचे पवित्र कार्य करीत आहे. मला उत्तेजन देण्यासाठी आपण माझ्यावर हे शेण अगर खडे फेकीत नसून ही फुले उधळीत आहात. तुमचे हे कृत्य मला हे शिकवते, की मी नेहमी अशीच आपल्या भगिनींची सेवा करीत राहावे. ईश्‍वर तुम्हाला सुखी ठेवो. सावित्रीमाईंची वैचारिक उंची केवढी थोर होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT