Bird Nest Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Life : अज्ञात पाखरू आज तिथं दिसलं नाही

Agriculture Rural Story : कडवळीवर एका पाखराने खोपा केला... कडवळ कापताना विळा लागू नये म्हणून लक्ष शक्यतो खालीच असतं. अचानक अर्धवट विणलेल्या खोप्यावर लक्ष गेलं म्हणून तेवढं सोडून दिलं.

Team Agrowon

सोमनाथ कन्नर

Indian Agriculture : कडवळीवर एका पाखराने खोपा केला... कडवळ कापताना विळा लागू नये म्हणून लक्ष शक्यतो खालीच असतं. अचानक अर्धवट विणलेल्या खोप्यावर लक्ष गेलं म्हणून तेवढं सोडून दिलं. रोज निरीक्षण सुरू होतं. पाखराचा खोपा विणून पूर्ण झाला. त्याने एक-एक करून आठवड्याभरात तीन अंडी घातली.

इतके दिवस बघतोय पण पाखरू एकदाही दिसलं नाही. निसर्गाचं प्रत्येक सृजन हर्ष देणारं असतं. कितीही तणावात असा, असलं काही दिसलं कि क्षणभर हरखून जातो माणूस. सगळं विसरतो. परवा रात्री मुसळधार पाऊस पडला. त्यातही खोपा शाबूत राहिला. समाधान वाटलं. दुर्दैवाने ते दीर्घकाळ टिकणारं नव्हतं..

आज काल बघितलं तर...

खोपा विस्कटून खाली पडलेला होता. साप, घोरपड, रानमांजर किंवा कावळा, घार यापैकी कशानेतरी खोपा मोडून अंडी खाऊन घेतली. उध्वस्त झालेला खोपा बघून वाईट वाटलं. ते पाखरू हे सगळं घडताना विरोध करत असेलच. शेवटी विरोध करण्यास असमर्थ ठरल्यावर दूर फांदीवर बसून केवलीवाणं होऊन आर्त ओरडत असेल.

निसर्ग त्याच्यावर अवलंबून असलेल्या प्रत्येकाशी असाच खेळत असतो. त्यातून सावरायची ताकदही तोच देतो.. ते अज्ञात पाखरू आज तिथं दिसलं नाही.. त्याने नवीन भरारी घेतली असेल.. नवं आयुष्य नवा खोपा विणायला घेतला असेल.

निसर्ग एवढा लहरीपणा करत असतानाही शेतकरी खचून जात नाही. त्याच्या जगण्याच्या, झुंजण्याच्या प्रेरणा अशाच रानपाखरांकडून आलेल्या असतात.. निसर्ग सगळं हिरावून घेतो... पुन्हा भरभरून देतो.. त्याच्या हेतूवर शंका घेऊन कधीच कुणी पेरणी थांबवली नाही.. व्यवस्था मात्र शेतकऱ्याला उध्वस्त, हतबल करून सोडते. साप, रानबोका, कावळा, ससाण्यासारखी...

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement : हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी ४७८ केंद्रे

Livestock Census : राज्यात ॲपद्वारे होणाऱ्या पशुगणनेस आजपासून प्रारंभ

Dana Cyclone : ‘डाना’ चक्रीवादळ आज किनाऱ्याला धडकण्याची शक्यता

Fruit Crop Insurance Issue : फळपीक विमा योजनेत बोगस अर्जांचे ‘पीक’

Vidarbha Weather : विदर्भात पावसाला पोषक हवामान

SCROLL FOR NEXT