Farmer Accident Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Accident Scheme : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदानाला मान्यता; ३० कोटींचं होणार वितरण

२०२४-२५ साठी मंजूर प्रस्ताव निकाली काढण्यासाठी ३० कोटी इतके अनुदान वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.

Dhananjay Sanap

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजने अंतर्गत ३० कोटी अनुदान वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. २०२४-२५ वर्षातील मंजूर प्रस्ताव निकाली काढण्यासाठी चालू आर्थिक वर्षात अर्थसंकल्पीय तरतुदीतून सदर अनुदान देण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय सोमवारी (ता..९) प्रसिद्ध केला आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत मृत्यू पावलेल्या अथवा अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांनी मदत अनुदान देण्यात येते. राज्यात २०१५-१६ पर्यंत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबवली गेली. परंतु या योजनेत अनेक त्रुटी होत्या. विमा कंपन्याकडून दावे निकाली काढण्यात दिरंगाई केली जात होती. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळत नव्हती. त्यामुळं राज्य सरकारनं २०२३ पासून सानुग्रह अनुदान तत्वावर योजना राबण्याचा निर्णय घेतला. या योजनेतून अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना २ लाख रुपयांची मदत दिली जाते.

या योजनेतून २०२४-२५ या आर्थिक वर्षात करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून या योजनेच्या २०२३-२४ या वर्षातील मंजूर प्रस्तावासाठी २५.७२ कोटी निधी वितरित करण्यात आला आहे. तसेच २०२४-२५ साठी मंजूर प्रस्ताव निकाली काढण्यासाठी ३० कोटी इतके अनुदान वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.

दरम्यान,शेतकऱ्याचा खालीलपैकी कोणत्याही कारणाने मृत्यू झाला असल्यास योजनेअंतर्गत त्याच्या कुटुंबाला अर्ज करता येतो. रस्ता किंवा रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना किंवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचूदंश नक्षलाईकडून झालेल्या हत्या, जनावरांच्या खाल्ल्यामुळे/चावण्यामुळे जखमी किंवा मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Marigold Flower Rate : लाल-पिवळ्या झेंडूचा भाव वधारला

Crop Damage Survey Issue : पीक नुकसानीचे सर्वेक्षण अद्याप सुरूच; शेतकऱ्यांना फटका

Post Monsoon Rain : मॉन्सूनोत्तर पावसाचा धुमाकूळ

Adulteration Issue : ‘अन्न, औषध’चा भेसळखोरांवर बडगा

Rabi Sowing : रब्बीच्या पेरण्यांची मंदगती

SCROLL FOR NEXT