Takari Upsa Irrigation Scheme agrowon
ॲग्रो विशेष

Irrigation Scheme : बेलकुंड उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाला मंजुरी

Team Agrowon

Latur News : माकणी (ता. लोहारा) येथील निम्न तेरणा प्रकल्प तसेच तेरणा नदीवरील बॅरेजेसमुळे धाराशिव व लातूर जिल्ह्यांतील अनेक गावे सिंचनाखाली आले आहेत. मात्र प्रकल्पापासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावरील बेलकुंड व परिसरातील गावांना प्रकल्पातील पाण्याचा काहीच फायदा होत नव्हता.

यामुळे प्रकल्पातून बेलकुंड उपसा जलसिंचन योजनेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्याला यश आले असून, योजनेच्या सर्वेक्षण व अन्वेषण कामाला जलसंपदा विभागाने मंजुरी दिल्याची माहिती औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली.

सर्वेक्षणानंतर तातडीने अंदाजपत्रक तयार करून अंतिम मंजुरी मिळवून योजना लवकरात लवकर प्रत्यक्षात कार्यान्वित केली जाणार असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले. निम्न तेरणा प्रकल्पाच्या वरील भागातील बेलकुंड, कवळी, हिप्परगा, वांगजी, देवताळा, तावशी ताड, माळकोंडजी, माळुंब्रा, तुंगी, मसलगा( खु.), संक्राळ, हसलगण, चिंचोली काजळे, नांदुर्गा, टाका, सिंदाळा व गुळखेडा आदी १६ ते १७ गावांना धरण उशाला असूनही सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नव्हते.

यामुळेच या गावांसाठी स्वतंत्र उपसा जलसिंचन योजना मंजूर करावी, अशी मागणी आमदार पवार यांनी केली होती. मागणीनंतर काही महिन्यांपासून ते शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करत होते. त्याला यश आले असून प्रकल्पातून योजनेच्या सर्वेक्षण व अन्वेषण कामास मंजुरी मिळाल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.

योजनेच्या मंजुरीने प्रकल्पाच्या कालव्याद्वारे उमरगा, निलंगा व औसा तालुक्यांतील ११ हजार ६१० हेक्टर सिंचन क्षेत्र तसेच आशिव उपसा सिंचन योजनेवरील ६ हजार ८९० हेक्टर सिंचन क्षेत्र व पाणीसाठा कायम ठेवण्यात आला असून, मंजूर प्रकल्पीय सिंचनात कोणतीही कपात प्रस्तावित नसल्याचे आमदार पवार यांनी स्पष्ट केले.

तेरणा नदीवरील नऊ बॅरेजेसच्या लाभक्षेत्रातील पाणीवापरात होणारी बचत विचारात घेऊन बेलकुंड उपसा जलसिंचन योजनेचे नियोजन करण्यात आले आहे. निम्न तेरणा प्रकल्पाच्या फेरनियोजनामुळे कायम सिंचानापासून वंचित असलेल्या बेलकुंड व परिसरातील गावच्या शिवारात तीन ते साडेतीन हजार क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT