Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Marathwada News : मराठवाड्याच्या भूमीला निजामाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी लढलेल्या मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
Marathwada Mukti Sangram
Marathwada Mukti SangramAgrowon
Published on
Updated on

Latur News : मराठवाड्याच्या भूमीला निजामाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी लढलेल्या मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. या इतिहासाला साक्षी ठेवून जिल्ह्याच्या विकासासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी दिली.

हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभ येथे मंगळवारी (ता. १७) मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्य शासकीय राष्ट्रध्वज वंदन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर जिल्हाधिकारी संगीता टकले, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, तहसीलदार सौदागर तांदळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Marathwada Mukti Sangram
Marathwada Mukti Sangram Din 2024 : मराठवाड्याच्या विकासासाठी १४३४ कोटींची तरतूद : मुख्यमंत्री शिंदे

मराठवाडा ही संत-महंतांची, बुद्धिवंतांची भूमी आहे. तशीच त्यागाची, समर्पणाची व बलिदानाचीही भूमी असून या भूमीला धैर्याचा, शौर्याचा व संघर्षाचा प्रगल्भ ऐतिहासिक वारसा लाभला आहे. देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. मात्र मराठवाड्यातील जनतेला स्वातंत्र्याचा सूर्य पाहण्यासाठी त्यानंतरही १३ महिने, अर्थात १७ सप्टेंबर १९४८ पर्यंत संघर्ष करावा लागला.

Marathwada Mukti Sangram
Marathwada Mukti Sangram : मराठवाड्याला मागास शब्दापासून मुक्ती देणार

मराठवाड्याला निजामाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली येथे मोठे आंदोलन छेडले गेले. या आंदोलनात थोर स्वातंत्र्य सेनानी बाबासाहेब परांजपे, डॉ. देवीसिंह चौहान यांच्यासारखे अनेक स्वातंत्र्यवीर आणि लातूरकरांचे अमूल्य योगदान आहे, हे आपणास विसरून चालणार नाही. गाव-वस्तीतील जनतेने मराठवाडा मुक्ती संग्रामात सक्रिय सहभाग घेतला.

या वेळी सरकारच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा तपशीलही त्यांनी सादर केला. स्वातंत्र्य सेनानी व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींची भेट घेतली. पोलिस दलाच्या बँड पथकाने राष्ट्रगीतासह महाराष्ट्र गीत गीत सादर केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com