Sindhudurg Compensation Agrowon
ॲग्रो विशेष

Sindhudurg Relief fund: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालमत्ता नुकसानग्रस्तांच्या भरपाईला मान्यता

Government Approves Relief fund: सिंधुदुर्ग जिल्ह्यात नोव्हेंबर २०२१ ते मे २०२२ दरम्यान गारपीट आणि अवकाळीची मालमत्ता नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य सरकारने गुरुवारी (ता.९) मान्यता दिली आहे.

Dhananjay Sanap

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नोव्हेंबर २०२१ ते मे २०२२ दरम्यान गारपीट आणि अवकाळीची मालमत्ता नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य सरकारने गुरुवारी (ता.९) मान्यता दिली आहे. नुकसानग्रस्तांसाठी १५ लाख ४ हजार रुपयांच्या भरपाई मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे गारपीट आणि अवकाळीने मालमत्तेचं नुकसान झालेल्या मदतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

नोव्हेंबर २०२१ ते मे २०२२ च्या गारपीट आणि अवकाळीने केलेल्या नुकसानीची भरपाईसाठी विभागीय आयुक्तांनी राज्य सरकारकडे २ सप्टेंबर २०२४ रोजी निधीची मागणी केली होती. त्यानुसार हा निधी वितरित करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे.

या निधीची वाटप कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थीची यादी आणि मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात नोव्हेंबर २०२१ ते मे २०२२ च्या कालावधी विविध भागात अवकाळी आणि गारपीटीने नुकसान केलं होतं. शेती पिकांसोबतच जनावरांच्या गोठ्याचं, घरांचं आणि मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. सरकारने तातडीने मदत देण्याची मागणी नुकसानग्रस्त करत होते. यापूर्वीच्या मदतीत गरज पडल्यास आयुक्तांच्या मागणीनुसार निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही राज्य सरकारने दिलेली आहे. त्यानुसार या मदत निधीला मान्यता देण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E Peek Pahani: खरीप ई-पीक पाहणीचे ‘तीन तेरा’

Modi Government Criticism: भाजपची आता ‘सत्ताचोरी’ची तयारी : मल्लिकार्जुन खर्गे

Maharashtra Smart Village: प्रत्येक तालुक्यात दहा गावे स्मार्ट, इंटेलिजंट करणार

S. Jaishankar: अमेरिकी सरकारचा निर्णय चुकलाच

Society Equality: सामाजिक विषमता दूर झाली पाहिजे: डॉ. प्रकाश आमटे

SCROLL FOR NEXT