Farm Pond Agrowon
ॲग्रो विशेष

Farm Pond Scheme : राज्यात २३ हजार शेततळ्यांना मंजुरी

Agriculture Irrigation Scheme : सोडत पद्धत रद्द करुन ‘मागेल त्याला शेततळे’ देण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य शासनाने जाहीर केल्यानंतर आतापर्यंत २३ हजार नव्या शेततळ्यांना मंजुरी देण्यात आली आहे.

मनोज कापडे

Pune News : सोडत पद्धत रद्द करुन ‘मागेल त्याला शेततळे’ देण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य शासनाने जाहीर केल्यानंतर आतापर्यंत २३ हजार नव्या शेततळ्यांना मंजुरी देण्यात आली आहे. शेततळे खोदाईला अनुदान देण्याची योजना सर्वप्रथम तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या संकल्पनेतून आकाराला आली होती.

केंद्राने राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून सामूहिक शेततळ्यांसाठी २००९ पासून अनुदान देण्यास सुरुवात केल्यानंतर तळे खोदाईकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१६ मध्ये वैयक्तिक स्तरावर ‘मागेल त्याला शेततळे’ ही स्वतंत्र योजना आणली. परंतु अनुदान केवळ ५० हजार रुपये असल्यामुळे योजनेचा अपेक्षित प्रसार झाला नाही.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, २९ जून २०२२ रोजी मुख्यमंत्री शाश्‍वत कृषी सिंचन योजनेत शेततळ्याचा समावेश झाला व अनुदानदेखील ७५ हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आले. त्यामुळे शेततळे खोदाईसाठी शेतकरी पुन्हा उत्सुकता दाखवू लागले.

अर्थात, अर्ज केल्यानंतर सोडत काढली जात असल्याने अनुदान मिळते की नाही, या बाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था होती. सोडतीत अर्ज मंजूर न झाल्यास इच्छा असूनही तळे खोदता येत नव्हती. परंतु आता सोडत पद्धत हटवून अर्ज करताच शेततळे देण्याचे नवे धोरण सरकारने आणल्यामुळे पहिल्याच टप्प्यात सहा हजाराच्या आसपास नवी शेततळी राज्यात खोदली गेली आहेत.

...अशी आहे शेततळे योजनेची वाटचाल

अनुदान मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या ः ५९७६

शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा झालेली अनुदान रक्कम ः ४०.८९ कोटी रुपये

नव्याने पूर्वसंमती मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या ः २३१३३

योजनेसाठी निश्‍चित केलेले उद्दिष्ट ः १३५००

अहमदनगर जिल्हा राज्यात आघाडीवर

मागेल त्याला शेततळे योजनेचा लाभ घेण्यात अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी आघाडीवर आहेत. योजनेसाठी ३४ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. त्यात कागदपत्रे मात्र केवळ पाच हजार शेतकऱ्यांनी जमा केली. त्यातून ४३०० शेतकऱ्यांना तळे खोदण्यास पूर्वसंमती देण्यात आली.

पूर्वसंमती मिळालेल्या शेतकऱ्यांची जिल्हानिहाय संख्या अशी ः ठाणे १५३, पालघर १६९, रायगड १४९, रत्नागिरी ४८, सिंधुदुर्ग २७, नाशिक २९४१, धुळे २३६, जळगाव ३३१, नंदुरबार १४३, पुणे १०२७, सोलापूर २१८५, सातारा ३०१, सांगली १६७२, कोल्हापूर १९९, छत्रपती संभाजीनगर १६६३, जालना १५२४, बीड ९७०, लातूर २६२, धाराशिव ५०९, नांदेड ५९०, परभणी ३६७, हिंगोली २१५, बुलडाणा ३३७, अकोला २५१, वाशीम २४६, यवतमाळ ५४८, वर्धा ९९, नागपूर १३४, भंडारा ८६, गोंदिया १४६, चंद्रपूर ३०२, गडचिरोली ७६८.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement : हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी ४७८ केंद्रे

Livestock Census : राज्यात ॲपद्वारे होणाऱ्या पशुगणनेस आजपासून प्रारंभ

Dana Cyclone : ‘डाना’ चक्रीवादळ आज किनाऱ्याला धडकण्याची शक्यता

Fruit Crop Insurance Issue : फळपीक विमा योजनेत बोगस अर्जांचे ‘पीक’

Vidarbha Weather : विदर्भात पावसाला पोषक हवामान

SCROLL FOR NEXT