Shree Shankar Cooperative Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Factory Election : मोहिते पाटील गटाच्या सर्व उमेदवारांचे अर्ज वैध

Shree Shankar Cooperative Sugar Factory Election Update : श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सत्ताधारी मोहिते पाटील गटातील सर्व उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले.

Team Agrowon

Solapur News : सदाशिवनगर (ता. माळशिरस) येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सत्ताधारी मोहिते पाटील गटातील सर्व उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले.

तर विरोधी गटाचे नेते भानुदास सालगुडे पाटील यांच्यासह त्यांच्या पत्नी सौ. सालगुडे-पाटील यांचे अर्ज अवैध ठरले. त्यामुळे मोहिते पाटलांना विरोधकांचे असणारे आव्हान काहीसे संपुष्टात आल्याचे चित्र आहे.

निवडणुकीत अगदी मागच्या पंचवार्षिक निवडणुकीतही सालगुडे पाटील यांनी मोहिते पाटलांना आव्हान दिले होते. त्यानंतर यंदाही त्यांनी ताकदीनिशी लढत देण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचा अर्जच अवैध ठरल्याने बलाढ्य असा विरोधी गट उरलेला नाही.

एकूण २१ जागांसाठी २९ जण रिंगणात राहिले आहेत. या आठ उमेदवारांपैकी या प्रक्रियेत शेवटपर्यंत किती उमेदवार राहतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे :

माळशिरस उत्पादक गट- मिलिंद कुलकर्णी, सुरेश पाटील, महादेव शिंदे, गोपाळ गोरे, इस्लामपूर गट- बाळासाहेब माने, दत्तात्रय रणनवरे, कुमार पाटील, भीमराव दुधाळ, शिवाजी पवार, उत्तम बाबर.

नातेपुते उत्पादक गटातून - मालोजीराव देशमुख, सुधाकर पोळ, प्रफुल्ल कुलकर्णी, फोंडशिरस उत्पादक गट.- सदाशिव वाघमोडे-पाटील, शिवाजी गोरे, रणजीतसिंह मोहिते पाटील, रणजीत पाटील, बोरगाव उत्पादक गट - दत्तात्रय मिसाळ, सचिन लोकरे,बलभीम पाटील सहकारी संस्था : रणजीतसिंह मोहिते पाटील, मधुकर वाघमोडे, अर्जुनसिंह मोहिते पाटील अनुसूचित जाती किंवा जमाती प्रतिनिधी गट- अर्जुन धाईंजे, महिला राखीव प्रतिनिधी- लिलावती देवकर, लिलावती खराडे, यमुनाबाई निंबाळकर इतर मागासवर्गीय जाती प्रतिनिधी गट- रामदास कर्णे भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी गट-सुनील माने यांचा समावेश आहे,

अवैध ठरलेल्या उमेदवारांचे अर्ज :

माळशिरस उत्पादक गट- भानुदास सालगुडे-पाटील, इस्लामपूर गट - लालासो रणनवरे, अप्पा माळी.

नातेपुते गट - आनंदा मुळीक, सुभाष सुळ, फोंडशिरस उत्पादक गट - रामहरी गोडसे, मधुकर वाघमोडे, नारायण वाघमोडे, महिला राखीव प्रतिनिधी - नीलम सालगुडे पाटील, नागरबाई पालवे.

इतर मागास वर्गीय जातीचा प्रतिनिधी : शरद फुले भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी : नारायण वाघमोडे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pest Outbreak: हवामान बदलामुळे वाढला विषारी सुरवंटांचा प्रादुर्भाव

Indigenous Cattle Breeding: शाश्‍वत शेतीसाठी देशी गोवंश संवर्धन

Sharad Pawar Meets PM Modi: शरद पवार, सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, अचानक भेटीमुळे राजकीय वतुर्ळात चर्चा, नेमकं कारण काय?

Modern Fruit Plantation: फळझाडे लागवडीसाठी आधुनिक यंत्रे

Agriculture Machinery: जुन्या रिक्षा इंजिनापासून बहुउपयोगी कृषी यंत्र

SCROLL FOR NEXT