Sugar Factory Election : ‘शंकर’च्या निवडणुकीत २१ जागांसाठी ४४ जण रिंगणात

Sugar Factory Election Update : शंकर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी (ता.३०) २१ जागांसाठी ४४ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले.
Sugar Factory
Sugar FactoryAgrowon
Published on
Updated on

Solapur News : सदाशिवनगर (ता. माळशिरस) येथील शंकर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी (ता.३०) २१ जागांसाठी ४४ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले. कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील यांनी स्वतःचे तीन अर्ज दाखल केले आहेत.

रणजितसिंह यांनी गेल्या तीन वर्षांत कारखान्याला पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर मुदत संपल्याने आता पुन्हा कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे. विरोधी गटाकडून भानुदास सालगुडे पाटील यांनी त्यांना आव्हान दिले आहे. त्यांनी मोहिते पाटील गटाविरुद्ध विरोधकांना एकत्र करत काही उमेदवारांना या निवडणुकीत उतरविले आहे. त्यामुळे निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sugar Factory
Ajara Sugar Factory Election : आजरा साखर कारखान्यासाठी उद्या मतदान, पालकमंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटलांची ताकद पणाला

गटनिहाय उमेदवार याप्रमाणे

माळशिरस उत्पादक गट : मिलिंद कुलकर्णी, सुरेश पाटील, महादेव शिंदे, भानुदास सालगुडे पाटील, गोपाळ गोरे

इस्लामपूर उत्पादक गट : बाळासाहेब माने, दत्तात्रेय रणवरे, कुमार पाटील, लालासाहेब रणवरे, भीमराव दुधाळ, शिवाजी पवार, उत्तम बाबर, अप्पा माळी

नातेपुते उत्पादक गट : मालोजीराव देशमुख, सुधाकर पोळ, प्रफुल्ल कुलकर्णी, आनंदा मुळीक, सुभाष सूळ. फोंडशिरस उत्पादक गट ः सदाशिव वाघमोडे, शिवाजी गोरे, रामहरी गोडसे, भानुदास वाघमोडे, रणजितसिंह मोहिते पाटील, रणजित पाटील, नारायण वाघमोडे

बोरगाव उत्पादक गट : दत्तात्रेय मिसाळ, सचिन लोकरे, बलभीम पाटील

Sugar Factory
Sugar Factory Committee : साखर कारखान्यांच्या थकहमीसाठी समिती

उत्पादक सहकारी संस्था : रणजितसिंह मोहिते-पाटील (दोन अर्ज), गारेख रूपनवर, रामचंद्र पाटील. अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी गट ः अर्जुन धाईंजे

महिला प्रतिनिधी : लीलावती देवकर, लीलावती खराडे, नीलम सालगुडे पाटील, नागरबाई पालवे, यमुनाबाई निंबाळकर.

इतर मागास प्रवर्ग : रामदास कणो, शरद फुले

भटक्या जाती-जमाती गट : सुनील माने, नारायण वाघमोडे

उत्पादक सहकारी संस्था : मधुकर वाघमोडे, अर्जुनसिंह मोहिते-पाटील

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com