Kisan Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

PM Kisan Scheme : चिपळूण तालुक्यात ‘पीएम किसान, नमो सन्मान’चे १८०० शेतकऱ्यांचे अर्ज रद्द

Team Agrowon

Chiplun News: पीएम किसान आणि नमो सन्मान योजनेच्या नवीन नोंदणीसाठी शासनाकडून नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केलेल्या चिपळूणमधील १८०० शेतकऱ्यांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत.

त्यांना नव्याने अर्ज करण्याचे आवाहन येथील तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न म्हेत्रेयांनी केले आहे. शासनाच्या नव्या नियमानुसार वारसा हक्क वगळता ज्या लोकांनी २०१९ नंतर जमीन खरेदी केली असेल त्यांना शेतकरी म्हणून या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

तसेच पीएम किसान नोंदणी करताना पती-पत्नी व मुलांचे आधार कार्डही जोडावे लागणार आहेत. केंद्र सरकारने २०१९ मध्ये शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना सुरू केली.

या योजनेतून शेतकऱ्याला तीन हप्त्यांत वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. आता महाराष्ट्र शासनाने नमो सन्मान योजना लागू केली आहे. राज्य सरकारकडून राज्यातील शेतकऱ्यांना वर्षातून तीन हप्त्यांत सहा हजार रुपये मिळत आहेत.

या योजनेसाठी शेतकरी म्हणून कुटुंबातील पती-पत्नी यापैकी एकाला व २०१९ पूर्वी जमीन नोंद असेल तर अठरा वर्षांवरील मुलाला लाभ घेता येतो. पण काही पती-पत्नींच्या २०१९ नंतर जमीन नावे झालेले तसेच माहेरकडील जमीन नावावर आहे, म्हणून पती-पत्नी अर्ज नोंदणी करून या योजनेचा लाभ घेत आहेत.

ही बाब शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर लाभार्थींचे निधन झाले असेल तर वारसा हक्काने जमिनीची नोंद झाली असल्यास पती किंवा पत्नी पैकी एकालाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.

ॲग्रो विशेष

योजनेचा २५००० शेतकऱ्यांना लाभ

सरकारी किंवा निमसरकारी नोकरी करणाऱ्या शेतकऱ्यांना यापुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही. पात्र झालेल्या २५००० शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. १८०० शेतकऱ्यांनी नव्याने अर्ज केले होते. मात्र शासनाने नवीन नियम केल्यानंतर त्यांचे अर्ज रद्द करून त्यांना नव्याने अर्ज करण्याची सूचना करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paus Andaj : राज्यात ३ दिवस पावसाचे वातावरण; अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता!

Rabi Season 2024 : यंदा साडेतीन लाख हेक्टरवर रब्बीचे बुलडाण्यात नियोजन

Land Dispute : गावकऱ्यांचा डाव

Cattle Census App : तांत्रिक अडचणीत अडकलेल्या पशुगणनेची अखेर तारीख ठरली

Labor Shortage : पावसामुळे शेतकऱ्यांची घालमेल वाढली

SCROLL FOR NEXT