Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Prime Minister's Micro Irrigation Scheme : तुषार, ठिबक संचांचे अर्ज ‘महाडीबीटी’ स्वीकारेना

कृष्णा जोमेगावकर

कृष्णा जोमेगावकर : ॲग्रोवन वृत्तसेवा
MahaDBT Portal : नांदेड : पंतप्रधान सूक्ष्मसिंचन योजनेअंतर्गत तुषार, ठिबक संच घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करता येत नसल्याची स्थिती आहे. मागील दीड-दोन महिन्यांपासून अर्ज सादर करताना ते अर्ज नाकारले जात आहेत. ऐन दुष्काळी स्थितीत पाणी काटकसरीने वापरणे गरजेचे आहे.

नेमके अशावेळीच शेतकरी तुषार, ठिबक सिंचनापासून वंचित राहत आहेत. राज्य सरकारने महाडीबीटी पोर्टल मार्फत सर्व शेतकऱ्‍यांसाठी पंतप्रधान ठिबक व तुषार सिंचन योजना राबवली आहे. यामध्ये प्रत्येक अल्पभूधारक व अत्यल्प भूधारक शेतकऱ्याला ठिबक व तुषार सिंचनासाठी ५५ टक्के अनुदान आणि बहुभूधारक शेतकऱ्यांना ४५ टक्के इतके अनुदान देण्यात येते. तर केंद्र सरकार या लाभार्थ्यांना ३० टक्के अनुदान देते.

राज्य सरकार ही योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबविते. मात्र मागील दीड-दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांना तुषार, ठिबकसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करताना ‘एक हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र पात्र नाही’ असा संदेश येत आहे. असे असले तरी एक हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारले जात नाहीत. या वेळीही ‘एक हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र पात्र नाही’ असा संदेश येत आहे. यामुळे राज्यातील शेतकरी अवर्षणाच्या काळात अडचणीत आले आहेत.

दरम्यान, शेतकऱ्यांची निवड झाल्यानंतर त्यांची कागदपत्रे महाडीबीटी पोर्टलवर अपलोड होत नाहीत. शेतकऱ्यांची निवड होऊन कागदपत्रे अपलोड करण्याबाबतचा संदेशही उशिरा येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी कमी कालावधी मिळत आहे.

त्यामुळे लाभार्थ्यांचे प्रकरणे रद्द होत आहेत. या अडचणी संदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातून राज्याच्या कृषी आयुक्तालयाला अवगत केले आहे. परंतु अद्यापही अडचण कायम आहे.

फळबाग लागवडीचे अनुदानही कमी
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेबाबतही महाडीबीटी पोर्टलवर अडचणी येत आहेत. या योजनेत लाभार्थ्यांच्या अनुदानाची रक्कम अंदाजपत्रकापेक्षा खूपच कमी दाखविण्यात येत आहे. त्यामुळे मोका तपासणी करण्यासाठी अडचणी येत असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली.

‘महाडीबीटी’वरील अडचणींबाबत वरिष्ठ कार्यालयाला कळविले आहे. या पोर्टलवरील तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर अर्ज करता येतील.
- भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड

माझी तीन एकर शेती आहे. सातबारा महाडीबीटीवर दाखल करून तुषार सिंचनासाठी अर्ज करण्याचा प्रयत्न करीत आहे. अनेक वेळा प्रयत्न करूनही अर्ज ऑनलाईन दाखल होत नाही.
- उमेश केशवे, रा. आष्टा, ता. माहूर, जि. नांदेड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Makhana Benefits : मखनाचे आरोग्यदायी फायदे

Rahul Gandhi : राहुल गांधीचा भाजपवर हल्लाबोल, कोल्हापुरात शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण

Agriculture Processing : केळी चिप्स, हळद पावडरीचा ‘जटाशंकर’ ब्रॅण्ड

Sweet Potato : नवरात्रीला ‘शाहूवाडी’ रताळ्यांचा गोडवा

Floriculture : शेतकरी नियोजन : फुलशेती

SCROLL FOR NEXT