Animal Husbandry Department Agrowon
ॲग्रो विशेष

Govansh Seva Kendra Application : सुधारित गोवंश सेवा केंद्रासाठी, २५ ऑगस्टपर्यंत करा अर्ज

Govardhan Govansh Seva Kendra : राज्यस्तरीय योजनेअंतर्गत सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या योजनेसाठी जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, बार्शी, मंगळवेढा व माळशिरस या पात्र ४ तालुक्यांना या योजनेचा लाभ द्यावयाचा आहे.

Team Agrowon

Solapur News : राज्यस्तरीय योजनेअंतर्गत सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या योजनेसाठी जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, बार्शी, मंगळवेढा व माळशिरस या पात्र ४ तालुक्यांना या योजनेचा लाभ द्यावयाचा आहे. उपरोक्त तालुक्यातील गोशाळा चालकांनी सुधारित योजनेचे अर्ज २५ ऑगस्टपर्यंत भरावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त विशाल येवले यांनी केले.

योजनेचा उद्देश लाभार्थी गोशाळेच्या निवडीच्या अटी व वर्शी, लाभार्थी निवडीची प्रक्रिया तसेच योजनेचा विहित नमुन्यातील अर्ज अनुषंगिक कागदपत्रे इत्यादी सर्व बाबतची सविस्तर माहिती www.ahd.maharashtra.gov.in व www.mhgosevaayog.org या संकेतस्थळावर तसेच तालुकास्तरावर संबंधित पंचायत समिती पशुधन विकास अधिकारी (विस्तार) व जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाकडे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

इच्छुक पात्र गोशाळांनी विहित नमुन्यातील अर्ज आपल्या संबंधित तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याकडे २५ ऑगस्टपर्यंत सादर करावेत.

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाकडे थेट सादर केलेल तसेच ई-मेल किंवा तत्समद्वारे सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. या योजनेअंतर्गत यापूर्वी सादर करण्यात आलेले अर्ज सादर केलेले ग्राह्य धरले जाणार नसल्याने इच्छुक पात्र गोशाळांनी विहित नमुन्यात नव्याने अर्ज सादर करणे अनिवार्य आहे, असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. येवले यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT