MahaDBT Agrowon
ॲग्रो विशेष

MahaDBT : आधी अर्ज मंजूर, नंतर कारणाविना रद्द

Agriculture Scheme : शेतकऱ्याला मिनी स्प्रिंकलरसाठी आधी मंजूर झालेला अर्ज पुन्हा कोणतेही कारण न देता रद्द करण्यात आला

सुदर्शन सुतार

Solapur News : महाडीबीटी पोर्टलवर रानमसले (ता. उत्तर सोलापूर) येथील शेतकऱ्याला मिनी स्प्रिंकलरसाठी आधी मंजूर झालेला अर्ज पुन्हा कोणतेही कारण न देता रद्द करण्यात आला. पण ‘महाडीबीटी’च्या पोर्टलचा हा तांत्रिक दोष आहे, आम्ही काहीच करू शकत नाही, असे सांगत स्थानिक कृषी अधिकाऱ्यांनी हात वर केले आहेत.

रानमसले येथील लक्ष्मण विलास गरड (गट नंबर ६१३/१) या शेतकऱ्याने मिनी स्प्रिंकलर सिंचनासाठी २८ मे २०२३ रोजी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज केला होता. १२ सप्टेंबरला लाभार्थी निवड झाल्याबद्दल मोबाइलवर त्यांना संदेश आला. यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी तातडीने दुसऱ्या दिवशी १३ सप्टेंबर २०२३ रोजी आवश्यक असणारी कागदपत्रे महाडीबीटी पोर्टलवर अपलोड केली.

मात्र योजनेचे साहित्य खरेदी करण्यासाठी पूर्वसंमती मिळालीच नाही. विशेष म्हणजे पुन्हा ३१ डिसेंबर २०२३ पुन्हा गरड यांना मोबाइलवर संदेश आला, त्यात म्हटले होते, की आपणास पूर्वसंमती देऊन २५ दिवस झाले असून, पुढील पाच दिवसांत संबंधित देयके कागदपत्रे अपलोड करावीत, अन्यथा आपला अर्ज रद्द करण्यात येईल. वास्तविक, या आधी असा कोणताही संदेश त्यांना आला नव्हता, पण त्याच दिवशी पुन्हा कोणत्याही अन्य कारणाविना आपला अर्ज रद्द करण्यात येत आहे, असे पत्र महाडीबीटी पोर्टलवर आढळून आले.

‘आता पुन्हा अर्ज करा’

दरम्यान, गरड यांनी तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ यांच्याशी संपर्क साधला. ‘‘सर्व प्रक्रिया ऑनलाइन असल्यामुळे मला काही त्यात करता येत नाही’’, असे उत्तर त्यांच्याकडून मिळाले. तसेच ‘‘आता पुन्हा अर्ज करा,’’ असा सल्ला देण्यात आला. त्यामुळे सात-आठ महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या शेतकऱ्याला मनस्तापाशिवाय पदरी काहीच पडले नाही.

आधी अर्ज मंजूर केला, शिवाय पूर्वसंमती देण्यासाठीही वेळ घेतला. त्यात पुन्हा माझा अर्ज रद्द करण्याचा संदेश आला. त्यामुळे मला आश्‍चर्य वाटते, शिवाय कोणतेही कारण दिले नाही. या प्रकरणातून केवळ मला मनस्तापच झाला.
- लक्ष्मण गरड, शेतकरी, रानमसले
लक्ष्मण गरड या शेतकऱ्याच्या बाबतीत हा सर्व घडलेला प्रकार क्वचितच घडतो. हा सर्व ऑनलाइन सिस्टिमचा तांत्रिक दोषाचा भाग आहे आहे. त्यामुळे त्यात तालुका कृषी कार्यालय काहीही करू शकत नाही.
- मनीषा मिसाळ, तालुका कृषी अधिकारी, उत्तर सोलापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Export : निर्यातीचा पकडा ‘धागा’

Rabi Crop Demonstration : तेलबिया उत्पादनाचे रब्बीत १७,८०० हेक्टरवर पीक प्रात्यक्षिके

Distillery Project : आसवनी प्रकल्पांच्या पाण्याचे वर्गीकरण वादात

Malegaon Sugar Factory : ‘माळेगाव’चे १५ लाख टन ऊस गळिताचे उद्दिष्ट

Quality Control Department Issue : ‘गुणनियंत्रण’च्या बदल्यांसाठी समुपदेशन हाच एकमेव पर्याय

SCROLL FOR NEXT