Banana Crop Damage agrowon
ॲग्रो विशेष

Banana Crop Damage : केळीच्या नुकसानीचे पंचनामे गतीने करा

Fruit Crop Insurance Scheme : यंदा फळ पीकविमा योजनेत जिल्ह्यातील सुमारे ७५ हजार शेतकरी सहभागी झाले आहेत. केळी पिकाच्या नुकसानीसंबंधी या योजनेतून भरपाई मिळते.

sandeep Shirguppe

Banana Crop Damage Jalgaon : जळगाव जिल्ह्यात वादळी गत काळात पावसासह गारपिटीत मोठ्या क्षेत्रातील केळी व इतर पिके, बागांची हानी विविध भागात मागील कालावधीत झाली आहे. परंतु पंचनाम्यांची गती धीमी आहे. यातच भरपाई ठरविताना विमा कंपनीने नुकसानीची टक्केवारी व्यवस्थित गृहीत धरावी, असाही मुद्दा उपस्थित केला जात आहे.

यंदा फळ पीकविमा योजनेत जिल्ह्यातील सुमारे ७५ हजार शेतकरी सहभागी झाले आहेत. केळी पिकाच्या नुकसानीसंबंधी या योजनेतून भरपाई मिळते. परंतु या योजनेतून परतावे देताना विमा कंपनीने अनेकदा वस्तुस्थिती लक्षात घेतली नाही. मागील वेळेस या योजनेतून वादळात नुकसानीसंबंधी भरपाई किंवा विमा योजनेतील वादळात नुकसानीचे परतावे उशिराने शासनाकडून मिळाले. केळी उत्पादकदेखील वादळात नुकसान भरपाईच्या वितरणाबाबत किंवा कमी भरपाई दिल्याबाबत नाराज होते.

२०२३-२४ मध्ये फळ पीकविमा योजनेत जिल्ह्यातील सुमारे ५२ हजारांवर शेतकरी सहभागी झाले. या शेतकऱ्यांनी केळी पिकासाठी विमा संरक्षण घेतले होते. यंदा सहभागी शेतकरीसंख्या अधिक आहे. विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांच्या केळीची जळगाव, यावल, रावेर, मुक्ताईनगर आदी भागात हानी झाली. विमा योजनेतून नुकसानीची पातळी, स्थिती लक्षात घेऊन भरपाई दिली जाते. ही भरपाई कमाल ७५ हजार रुपये एवढी प्रतिहेक्टरी मिळते.

गेल्या हंगामात जिल्ह्यात वादळात केळीची ३० ते ८० टक्के एवढे नुकसान झाले. रावेरातील उत्तर, पूर्व व मध्य भागात मोठी हानी झाली होती. तसेच मुक्ताईनगर, जळगाव, यावल, चोपडा भागातही केळीचे वादळात नुकसान झाले. परंतु परतावे किंवा भरपाई देताना अनेक विमाधारकांना हेक्टरी अडीच हजार रुपयेच मिळाल्याची स्थिती होती. काही भागात हे परतावेच कंपनीने नुकसान झालेले नसल्याचे सांगून नाकारले.

यंदाही नुकसान वादळ, गारपिटीत या महिन्यात सतत होत आहे. सुमारे पाच हजार तक्रारी वादळात नुकसानीसंबंधी विमा कंपनीकडे प्राप्त झाल्या आहेत. यात पंचनामे करताना धरसोडपणा न करता शेतकरीपूरक कार्यवाही करावी, अशी मागणी केली जात आहे.

गिरणा पट्ट्यातही नाराजी

जिल्ह्यात दरवर्षी वादळात केळी व इतर फळबागा, रब्बी पिकांची हानी होते. त्याचे पंचनामे शासन करते. परंतु विमा कंपनीकडून भरपाई तोकडी मिळाली आहे. दिली जात नाही. पाचोरा, एरंडोल, चाळीसगाव, जळगाव, धरणगाव, भडगाव तालुक्यातही मार्च ते जून मध्ये वादळात केळी व इतर फळबागांचे नुकसान झाले होते. यात केळी व अन्य बागांचे अतोनात नुकसान झाले होते. तसेच भाजीपाला पिकांसह चाऱ्याची हानी झाली होती. खरीप व रब्बी त्याचे हंगामात दरवर्षी शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते.

२०१९ ते २०२५ या कालावधीत सतत गिरणा पट्ट्यात वादळ, गारपिटीत हानी होत आहे. नुकसानीचे सर्वेक्षण शासन व विमा कंपनीकडून करण्यात आले. नुकसान किती झाले, याची माहिती घेऊन तसा अहवाल प्रशासनाने शासनास सादर केला. परंतु शासनाकडून किंवा महसूल विभागाकडून अद्याप नुकसानग्रस्तांना भरपाई मिळालेली नाही. विमा कंपनीदेखील टाळाटाळ व टक्केवारीचा खेळ करते. असाच प्रकार शासनही करू लागल्याची नाराजी गिरणा पट्ट्यात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate In Maharashtra : कांदा निर्यात धोरणामुळेच दर घसरले असे म्हणता येणार नाही; लोकसभेत केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

Opposition MPs Protest: विरोधी खासदारांची काळे कपडे घालून संसद परिसरात निदर्शने, लोकसभा, राज्यसभेचे कामकाज तहकूब

El Nino Update : एल निनो मार्च २०२७ पर्यंत टिकण्याची ९७ टक्के शक्यता; अमेरिकेच्या हवामान संस्थेचा अंदाज

Rainwater Harvesting: पर्जन्यजल संधारण : महत्त्व, नियोजन अन् प्रभावी व्यवस्थापन

Smart Mango Farming: ९० एकरांतील व्यवस्थापन तंत्रज्ञानामुळे झाले सुलभ

SCROLL FOR NEXT