Ajit Pawar : मागणीपेक्षा अधिक खते, बियाणे उपलब्ध करून ठेवा : उपमुख्यमंत्री पवार

Bogus Seed Beed : बिड जिल्ह्यात बोगस बियाणे मोठ्या प्रमाणावर विकल्याचे प्रकार मागील काळात घडले. तसेच खताबाबतही तीच स्थिती होती, याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे आमदारांनी म्हणणे मांडले.
Ajit Pawar
Ajit Pawaragrowon
Published on
Updated on

Beed Kharip Season : खरीप हंगामात खते आणि बियाणे क्षमतेपेक्षा जास्त उपलब्ध राहील याचे नियोजन करा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. बीड येथील नियोजन समिती सभागृहात खरीप हंगाम २०२५ पूर्वतयारीचा आढावा त्यांनी सोमवारी (ता. १९) एका बैठकीत घेतला. त्या वेळी ते बोलत होते.

यावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, खासदार बजरंग सोनवणे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जिवने तसेच पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी आमदार धनंजय मुंडे, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळंके, आमदार नमिता मुंदडा, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार विजयसिंह पंडित आदींची यावेळी विशेष उपस्थिती होती.

जिल्ह्यात बोगस बियाणे मोठ्या प्रमाणावर विकल्याचे प्रकार मागील काळात घडले. तसेच खताबाबतही तीच स्थिती होती, याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे आमदार प्रकाश सोळंके, सुरेश धस तसेच आमदार संदीप क्षीरसागर आणि विजयसिंह पंडित यांनी सांगितले. यावर उपायासाठी गुणनियंत्रण पथकाने काम वाढवावे असे निर्देश श्री. पवार यांनी दिले.

गेवराई येथील आमदार विजयसिंह पंडित यांनी खताच्या रॅक परळी वैजनाथ येथे असल्याने खतासाठी जादा पैसे मागितले जातात. त्यामुळे जवळच्या जालना येथे खताच्या रॅक ठेवण्याची मागणी केली. यावर श्री. पवार यांनी मुंबईत अधिकाऱ्यांनी बैठकीतूनच फोनद्वारे तो बदल करण्याचे आदेश दिले. खरीप हंगामासाठी तालुकानिहाय खताचे नियोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात या हंगामात ४३०० टन युरिया आणि १२५० टन डीएपी लागेल असा अंदाज आहे. १७ मेपर्यंत युरिया ६४६ टन आणि डीएपी ७५७.५ टन असा संकलित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी या वेळी दिली.

Ajit Pawar
Bogus Seed : बोगस बियाणे, खतांचा पुरवठा न होण्याबाबत दक्षता घ्या

कृषी पतपुरवठा स्थितीत सुधारणा होणे गरजेचे

जिल्ह्यात कृषी पतपुरवठा स्थितीत सुधारणा होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना सावकाराकडून पैसे घेण्याची वेळ येऊ नये यासाठी कृषी कर्जातील तांत्रिक अडचणी सोडविण्यावर विचार करण्यात येणार असल्याचीही माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी या वेळी दिली. अनेकदा दुबार पेरणीची वेळ येते अशी वेळ येऊ नये यासाठी राज्यस्तरावर सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम केले जाणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com