Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : तूर, कांदा पीकविम्यासाठी कृषी सचिवांकडे अपील

Crop Insurance Scheme : शेतकऱ्यांनी पिकांचा एक रुपयात विमा उतरविला, पण अजूनही त्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही.

Team Agrowon

Solapur News : शेतकऱ्यांनी पिकांचा एक रुपयात विमा उतरविला, पण अजूनही त्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. सुरुवातीलाच विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या माहितीवर आक्षेप नोंदवत विभागीय आयुक्त, कृषी आयुक्तालयाकडे अपील केले. त्यानंतर सोयाबीन, मका व बाजरीच्या पिकांचा २५ टक्के अग्रिम दिला. आता पुन्हा कांदा, तूर अशा पिकांसाठी विमा कंपनीने कृषी सचिवांकडे अपील केल्याने या पिकांचा अग्रिम मिळायला विलंब होणार आहे.

जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळात २१ दिवसांचा पावसाचा खंड विमा कंपनीला मान्य नाही. दुसरीकडे शेतकऱ्यांनी भरलेल्या माहितीवर देखील कंपनीचा आक्षेप आहे. विमा कंपनीने सुरवातीला विभागीय आयुक्तांकडे अपील केले होते. त्याठिकाणी त्यांचे अपील फेटाळल्यानंतर आता कंपनीने कृषी सचिवांकडे अपील केले आहे.

वास्तविक पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढल्यानंतर ३० दिवसांत शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम मिळणे अपेक्षित आहे. परंतु, एक रुपयात विमा असल्याने शेतकऱ्यांची संख्या वाढली आणि विमा कंपनीने वेगवेगळ्या मुद्द्यांवर आक्षेप नोंदवत विभागीय आयुक्त, कृषी आयुक्तांकडे अपील केले. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या पाठपुराव्यातून सोयाबीन, मका व बाजरीचा अग्रिम शेतकऱ्यांना मिळाला. आता कांदा, तूर अशा पिकांचा अग्रिमची शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे.

‘रब्बी’साठीही एक रुपयात पीकविमा

प्रधानमंत्री पीकविमा योजना रब्बी हंगाम-२०२३ अंतर्गत एक रुपयात पीकविमा भरून मिळणार आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी गव्हासाठी (बागायत) हेक्टरी ३३ हजार, ज्वारीसाठी (बागायत) ३२ हजार ५०० रुपये, ज्वारीसाठी (जिरायती) २३ हजार, हरभऱ्यासाठी ३० हजार रुपये, उन्हाळी भुईमुगासाठी ४० हजार रुपये व रब्बी कांद्यासाठी ६५ हजार रुपये एवढी विमा संरक्षित रक्कम आहे. विमा भरण्यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक, सातबारा व आठ- अ उतारे व स्वयंघोषणापत्र अशी कागदपत्रे आवश्यक आहेत. शेतकऱ्याने लागवड केलेल्या पिकाची नोंद ई- पीक पाहणीत करावी.

विमा कंपनीचा ‘या’ मुद्द्यांवर आक्षेप

सोयाबीन, बाजरी व मका सोडून बाकीची पिके विम्यात मान्य नाहीत. जिल्ह्यात पावसाचा २१ दिवसाचा खंड असल्याची बाब अमान्य आहे. जास्त क्षेत्रावर विमा, सामाईक क्षेत्रावर संमती नाही, भाडेपट्टा जमिनीसाठी करार नाही, बहुतेक लाभार्थींच्या अर्जात त्रुटी असून त्याची तपासणी करावी लागणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Municipal Election Result 2026: २९ महापालिका निवडणूक मतमोजणीचा कल हाती, मुंबईवर कुणाची सत्ता?

Sugar Industry: आर्थिक आरोग्याची त्रिसूत्री

Seed Bill: नवीन बियाणे विधेयकाला किसान सभेकडून विरोध

MoU For Smart Farming: महात्मा फुले कृषी विद्यापीठ,बायफ संस्थेत संशोधनासाठी करार

Cotton Scam: व्यापाऱ्यांच्या कवडीमोल कापसाला सर्वोच्च प्रतवारी

SCROLL FOR NEXT