budget 2023 Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Budget 2023 : शेतमालाच्या मूल्यवर्धनासाठी महाकृषी विकास अभियान राबवण्याची घोषणा

शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी राज्यात एकात्मिक प्रकल्प आराखडा तयार करण्यात येणार आहे.

Team Agrowon

Budget Maharashtra 2023 : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्यात महाकृषीविकास अभियान राबवण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Finance Minister Devendra Fadnavis) यांनी अर्थसंकल्पात केली आहे.

या अभियाना अंतर्गत राज्यातील शेतमालाच्या उत्पादन ते मूल्यवर्धनासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच तालुका, जिल्हानिहाय शेतकरी गट आणि समुहासाठी योजना राबवण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी राज्यात एकात्मिक प्रकल्प आराखडा तयार करण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या मूल्यसाखळी उभारण्यासाठी अभियान राबवण्यात येणार आहे.

त्यासाठी राज्य सरकारकडून ५ वर्षात ३ हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्याची घोषणा फडणवीस यांनी अर्थसंकल्पात केली आहे.

राज्यात शेतमालाच्या मूल्यवर्धन साखळीच्या अभावामुळे शेतीमालाचे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्याना आर्थिक झळ सोसावी लागते. त्यासाठी राज्यात शेतमालाच्या विविध मूल्यवर्धित साखळी उभारण्यासाठी राज्य सरकारने तरतूद केली आहे.

दरम्यान, शेती क्षेत्रात अधिक गुंतवणूक वाढवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचेही फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले. त्याचाच भाग म्हणून या महाकृषी विकास अभियानाची घोषणा करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production Technology: साखर उत्पादनाकरिता सल्फरऐवजी कार्बन डायऑक्साइड: बी. बी. ठोंबरे

MaharashtraPolitics: भाजप सरकारची दंडेलशाही काँग्रेस सहन करणार नाही: प्रदेशाध्यक्ष सपकाळ

Maharashtra Farmer Death: शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबविण्यासाठी उपाययोजना करा; रघुनाथदादा पाटील यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र

Potato Varieties: शेतकऱ्यांची बटाटा वाण खरेदीकडे पाठ

VNMKV Agriculture Research: ‘वनामकृवि’च्या सहा वाणांना केंद्रीय स्तरावर मान्यता

SCROLL FOR NEXT