Water Scarcity  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : सांगा, मुक्या जित्राबाचं करायचं काय?

Drought Crisis : ‘आपल्याला बोलता येतं म्हणून पाणी मागू शकतो. त्यातही गेल्या काही दिवसांपासून माणसालाच पाणी पिण्यासाठी मिळत नाही, तिथे जनावरांना तरी कुठून मिळेल?

Team Agrowon

Nashik News : ‘आपल्याला बोलता येतं म्हणून पाणी मागू शकतो. त्यातही गेल्या काही दिवसांपासून माणसालाच पाणी पिण्यासाठी मिळत नाही, तिथे जनावरांना तरी कुठून मिळेल? साहेब, तुम्हीच सांगा, या मुक्या जित्राबांचं करायचं काय?’ हे शब्द आहेत, चांदवड तालुक्यातील खेलदरी परिसरातील शेतकऱ्यांचे. सध्या पाणीटंचाईने डोके वर काढले असून, बळीराजा चातकासारखी पावसाची वाट पाहत आहे.

चांदवड तालुक्यात दुष्काळ तसा पाचवीलाच पुजलेला. गेल्या काही वर्षात नाही म्हणायला काही भागात जलसिंचनाच्या सुविधा झाल्या. मात्र, खेलदरी परिसरासह अनेक भागात उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावाच लागतो.

सध्या तर परिसरातील जनावरांना एकच वेळ पिण्यासाठी पाणी मिळत आहे. वाड्या-वस्त्यांवर मे महिन्याच्या शेवटी पाणीटंचाईने तर अगदी कळसच गाठला आहे. येथील नागरिकांचे पिण्याच्या पाण्यावाचून प्रचंड हाल होत आहेत. त्यातच उन्हाची दाहकता वाढल्याने पाणीटंचाईने आणखीनच डोके वर काढले आहे.

आतापर्यंत परिसरातील शेतकऱ्यांनी पाणी विकत घेऊन घरातील कुटुंबियांची व पाळीव जनावरांची तहान भागवली आहे. आता तर विकतचे पाणीदेखील पुरेसे मिळणे अशक्य झाले आहे. खेलदरी गाव, वाड्या-वस्त्यांवर ४४ गाव पाणीपुरवठा योजनेचे पाणी बारा ते पंधरा दिवसांनी एकदाच येते. जे येते ते देखील पुरत नाही. त्यामुळे गावात टँकरने घरोघरी पाणी वाटप करावे लागते. जनावरांचा चाऱ्यासाठी पाटापलीकडील सुपीक भागातून उस व इतर चारा आणून भूक भागविली जात आहे.

विहिरींनी गाठला तळ

परिसरातील विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे शेतकरी विकतचे पाणी टँकरद्वारे आणून विहिरीत टाकून घरातील सदस्य व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करीत आहेत. आतापर्यंत खेलदरी परिसरातील ग्रामस्थांनी विकतचे पाणी घेऊन द्राक्षबागा जगविल्या. आता तर ते पाणीही विकत मिळणे मुश्किल झाले आहे. द्राक्षबागांना पाणी कुठून द्यायचे आणि जर द्यायचे म्हटले तर समोर पैशांचा प्रश्‍नही उभा राहतो.

दुष्काळी परिस्थितीमुळे द्राक्षबागा शेवटच्या घटका मोजत आहेत. परिसरातील शेतकरी व पाळीव जनावरांसाठी प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
- मालती जाधव, सरपंच, खेलदरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CCI Cotton Procurement Stop: कापूस संकटात; सीसीआयची  खरेदी आजपासून बंद, मुख्यमंत्र्यांच्या मागणीनंतरही मुदतवाढ नाही

Single Women Survey: मराठवाड्यात ग्रामपंचायतस्तरावर ४.९३ लाख एकल महिलांची नोंद

Delhi Excise Policy Case : दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी केजरीवाल, सिसोदिया निर्दोष, अश्रू अनावर

Warehouse Receipt: बुर्किना फासो गोदाम पावतीवर व्यवहार

Water Conservation: वृक्षारोपण, जलसंवर्धनाचा प्रोत्साहक योद्धा

SCROLL FOR NEXT