Radhakrishna Vikhe Patil On Dairy Project  Agrowon
ॲग्रो विशेष

Marathwada Dairy Project : विदर्भ- मराठवाड्यातील दुग्धविकास प्रकल्पांसाठी १४९ कोटींच्या निधीला मान्यता

Radhakrishna Vikhe Patil On Dairy Project : विदर्भ आणि मराठवाड्यातील १९ जिल्ह्यातील दुग्धविकास प्रकल्पांच्या दुसऱ्या टप्प्यातील कार्यक्रमाला सुरूवात होणार आहे. यासाठी १४९.२६ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासह पशुपालन व दुग्धव्यवसायातून शेतकऱ्यांना चालना देण्यासाठी दूग्ध विकास प्रकल्प राबवले जात आहेत. याआधी विदर्भ आणि मराठवाड्यात पहिल्या टप्प्यात ११ जिल्ह्यात काम सुरू केलं गेलं असून आता उर्वरीत ८ जिल्ह्यात देखील दूग्ध विकास प्रकल्पांच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील दुसऱ्या टप्यातील प्रकल्पांच्या कामासाठी १४९.२६ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. हे प्रकल्प राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ (एनडीडीबी) आणि मदर डेअरी यांच्या सहकार्याने केले जाणार असल्याची माहिती पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. मराठवाडा आणि विदर्भातील दूग्ध विकास प्रकल्पांबाबत मंगळवारी (ता. १३) राज्य मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. यानंतर विखे यांनी याची माहिती एक्सवर ट्विट करत दिली आहे.

यावेळी विखे यांनी, याआधी विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ११ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला होता. आता उर्वरीत ८ जिल्ह्यांचा देखील या योजनेत समावेश करण्यात आल्याचे सांगितले. दुग्धविकास प्रकल्पांतून उच्च उत्पादन क्षमता असलेल्या दुधाळ गायी-म्हशी, उच्च दुध उत्पादन क्षमता असलेल्या भृणांचे प्रत्यारोपण केलेल्या कालवडींचे अनुदान तत्वावर वाटप करण्यात येईल. तर या दुग्धविकास प्रकल्पांमुळे मराठवाडा आणि विदर्भात नवी दुधक्रांती येईल. प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी असा दावा विखे यांनी केला आहे.

तसेच मराठवाडा-विदर्भात आयोजित दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्प एनडीडीबी आणि मदर डेअरी यांच्या सहकार्याने केले जाणार आहेत. यात विदर्भ आणि मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांचा समावेश असून नागपूर येथे मदर डेअरी आणि एनडीडीबी एकत्र येऊन ५०० कोटी रूपये खर्चाचा दुग्ध प्रक्रिया प्रकल्प उभा करतील. यामुळे विदर्भ आणि मराठवाडाच्या विकासाला चालना मिळून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा दावा देखील विखे यांनी केला आहे.

मराठवाड्यातील जिल्ह्ये : नांदेड, जालना, धाराशिव, छत्रपती संभाजी नगर, बीड, परभणी, हिंगोली आणि लातूर

विदर्भातील जिल्ह्ये : नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT