Onion Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Rate : सोलापुरात कांद्याला मातीमोल भाव; २४ पोते कांद्याच्या मोबदल्यात शेतकऱ्याच्या हातात आले फक्त ५५७ रूपये

Onion Market : लोकसभा रणधुमाळीत शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी कांदा निर्यात बंदी हटवली. मात्र कांदाच्या दरात होणारी घसरण काही थांबलेली नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या पिकाला मातीमोल भाव मिळत आहे. यामुळे शेतकरी संताप व्यक्त करत आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : कांदा निर्यात बंदी लादल्यापासून कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे. यादरम्यान लोकसभा निवडणुकीच्या धामधूमीत कांदा उत्पादक शेतकऱ्याला खूश करण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली. यानंतर चार पैसे कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या पदरात पडतील असे वाटत असतानाच सर्व काही उलटे घडताना दिसत आहे. सोलापूर बाजार उत्पन्न समितीत कांद्याला कवडीचा भाव मिळाल्याचे समोर आले आहे. येथे एका शेतकऱ्याला २४ पोते कांद्याच्या मोबदल्यात फक्त ५५७ रूपये हाती आली आहेत. यावरून शेतकऱ्याकडून संताप व्यक्त केला जात आहे. मारुती उमाकांत खांडेकर असं शेतकऱ्याचं नाव असून त्याने शेतीसाठी सोनं गहाण ठेवून कांद्याची लागवड केली होती. 

अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील रहिवासी असणाऱ्या मारुती उमाकांत खांडेकर या शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने कांद्याचे पीक वाढवले होते. हजारो रूपये खर्च करून दिवस-रात्र एक करून कांदा पिक घेतले होते. विशेष म्हणजे कांदा लागवडीसाठी घरातील सोने गहाण ठेवून पिकासाठी पैसा उभा केला होता. मात्र खांडेकर यांची सर्व मेहनेत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वाया गेली आहे. 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खांडेकर यांनी आपल्या २४ कांद्याच्या गोण्या विक्रीसाठी आणल्या होत्या. मात्र दुपारच्या वेळेत कांद्याचे भाव घसरले. त्याच्या कांद्याला फक्त ४५ पैशांचा भाव मिळाला. यामुळे उपस्थित कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह खांडेकर यांना धक्का बसला. २४ कांद्याच्या पोत्यांच्या बदल्यात व्यापाऱ्यांने हमाली, तोलाई, गाडी भाडे असा सर्व खर्च वजा करून खांडेकर यांच्या हातात फक्त ५५७ रुपयांची पट्टी थांबवली. यावरून हताश झालेल्या खांडेकर यांनी, आम्हीही आता गळफास घ्यायचा का? असा उद्वीग्न सवाल केला आहे. 

तर ४५ पैशांचा भावाप्रमाणे २४ कांद्याच्या पोत्यांची २८६६ रुपयांना विक्री झाली. यातून हमाल, गाडी भाडे, तोलाई असे २३०९ रुपये कापले गेले आणि खांडेकर यांच्या हातात फक्त ५५७ रूपये आले. यावरून खांडेकर यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच घरातील सोनं गहाण ठेवून शेतीत  सोनं पिकवलं. मात्र त्याला कवडीमोल भाव मिळाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT