Animal Care  Agrowon
ॲग्रो विशेष

Animal heatstroke : जनावरांनाही उष्माघाताचा धोका‎ काळजी घेण्याचे आवाहन

Animal Care : गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे जनावरांचे हाल होत असून, या वाढत्या तापमानाचा फटका जनावरांना बसणार असल्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

Team Agrowon

Animal heatstroke Update In Nandurbar : गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे जनावरांचे हाल होत असून, या वाढत्या तापमानाचा फटका जनावरांना बसणार असल्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन पशू संवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.

शहाद्यात १ लाखाच्या आसपास पशुधन‎ आहेत. उन्हाच्या झळांनी पशूंनाही‎ धोका निर्माण होतो.‎ मे महिन्यात तापमान हे ४० अंश सेल्सिअसच्या पुढे आहे.‎ त्यांचा विपरीत परिणाम हा गायी,‎ म्हशींच्या आरोग्य, कार्यक्षमता,‎ उत्पादकतेवर होऊ शकतो.‎

शरीरात या‎ वाढलेल्या तापमानामुळे ताण येतो. ‎त्यांचे शारीरिक तापमान (१०३ ते ११० ‎अंश फॅरानहाइट) वाढते. जनावरांची ‎तापमान नियंत्रण करण्याची शारीरिक‎ सहन क्षमता कमी पडल्यास‎ शारीरिक तापमानात वाढ होते. एका जागी उभे राहणे, बैचेन होणे, खाली ‎बसणे अशी लक्षणे दिसून येतात. यालाच उष्माघात म्हणतात.

वेळीच ‎उपचार न केल्यास जनावरेही ‎उष्माघातास बळी पडतात. सकाळी व संध्याकाळी ऊन कमी‎ असताना जनावरे चरण्यास‎ सोडावीत. मुबलक प्रमाणात थंड‎ पिण्याचे पाणी द्यावे.

बैलांकडून‎ शेतीच्या मशागतीची कामे शक्यतो‎ सकाळी व संध्याकाळी कमी उन्हात‎ करून घ्यावीत. अनेकदा जागेअभावी‎ किंवा अन्य कारणाने जनावरे‎ दुपारच्या वेळी भर उन्हात बांधली‎ जातात. याचा परिणाम असेही पशू संवर्धन विभागाने पशुपालकांना आवाहन केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT