Amul Milk Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Rate : अमूलच्या दूध विक्री दरात दोन रुपयांची वाढ

Amul Milk : लोकसभा निवडणूक झाल्यानंतर लगेचच गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क फेडरेशनच्या अमूल ब्रँडच्या दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांनी वाढ केली आहे.

बाळासाहेब पाटील

Mumbai News : लोकसभा निवडणूक झाल्यानंतर लगेचच गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क फेडरेशनच्या अमूल ब्रँडच्या दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांनी वाढ केली आहे. ही वाढ देशभरात लागू करण्यात आली असून फेब्रुवारी २०२३ नंतर ही वाढ करण्यात आली आहे.

गुजरातच्या अमूल दुधाने अपवाद वगळता देशभरातील बाजारपेठ काबीज केली आहे. मात्र, आता सर्वसामान्य ग्राहकांना दुधासाठी प्रति लिटर दोन रुपयांची झळ सोसावी लागणार आहे.

२ रुपये प्रति लिटरच्या वाढीमुळे एमआरपीमध्ये तीन ते चार टक्के वाढ होते जी सरासरी अन्न महागाईपेक्षा खूपच कमी आहे. अमूलने फेब्रुवारी २०२३ पासून कोणतीही वाढ केलेली नाही, असे अमूलने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

कामकाजाचा खर्च आणि दुधाचे उत्पादन वाढल्याने ही दरवाढ करण्यात आल्याचे अमूलचे म्हणणे आहे. अमूलच्या सहकारी दूध संघांनी शेतकऱ्यांना दिलेल्या दरात सहा ते आठ टक्क्यांनी वाढ केली आहे.

अमूलच्या धोरणानुसार दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी ग्राहकांकडून घेतलेल्या एक रुपयापैकी ८० पैसे दूध उत्पादकांना जातात. दरवाढीमुळे दूध उत्पादकांना दुधाचा वाढीव दर देण्यास मदत होईल.

असा असेल सुधारित दर

अमूल गोल्ड

अर्धा लिटर : ३४ रुपये

एक लिटर : ६८ रुपये

अमूल ताजा दूध

अर्धा : २८ रुपये

एक लिटर : ५६ रुपये

अमूल गाईचे दूध

अर्धा लिटर : २९ रुपये

एक लिटर : ५८ रुपये

अमूल म्हशीचे दूध

अर्धा ३७ रुपये

एक लिटर : ७२ रुपये

अमल स्लिम अँड ट्रिम

अर्धा : २५ रुपये

एक लिटर : ४९ रुपये

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Madat : अतिवृष्टीची मदत, पिकविमा आणि केंद्रीय पथकाच्या पाहणीवरून उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर निशाणा

Micro Plastic Pollution: मायक्रोप्लॅस्टिक प्रदूषणाचे माती, पिकांसाठी संकट

Rabbi Anudan GR: मराठवाड्यात ४ हजार ४८६ कोटी रब्बी अनुदान वाटपास मंजुरी

Turmeric Farming: हळद पिकात जैविक निविष्ठांवर भर

Farmer Protest: जातीकडून शेती-मातीकडे...

SCROLL FOR NEXT