Amul Whole Wheat Atta  Agrowon
ॲग्रो विशेष

Organic Amul: अमूलच्या सेंद्रिय गव्हाच्या पिठाचे प्रमाणीकरण

सेंद्रिय प्रमाणीकरण (Organic certification) ही संबंधित उत्पादनांची गुणवत्ता निर्धारित करणारी अशी प्रक्रिया आहे, ज्यात सेंद्रिय उत्पादनांची वाढ, स्टोरेज, प्रक्रिया, पॅकेजिंग आणि निर्यातक्षम उत्पादन अशा सर्वच कसोट्यांवर तपासणी केली जाते.

Team Agrowon

'अमूल' हा ब्रँड प्रस्थापित करणाऱ्या गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनच्या (GCMMF) सेंद्रिय गव्हाच्या पिठाला 'एसजीएस' कंपनीकडून सेंद्रिय उत्पादनाचे प्रमाणपत्र देण्यात आले. एसजीएसच्या प्रमाणीकरणामुळे अमूल फेडरेशनच्या सेंद्रिय उत्पादनांच्या विपणनाला गती मिळू शकेल.

गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचे (GCMMF) व्यवस्थापकीय संचालक डॉ. आर. एस. सोढी, मुख्य कार्यकारी अधिकारी जयेन मेहता, मुख्य महाव्यवस्थापक मनोरंजन पणी, निमित दोशी, समीर सक्सेना आणि एसजीएसचे नॉलेज बिझनेस विभागाचे संचालक नीलेश जाधव, प्रमाणीकरण विभागाचे प्रमुख अरुप जन यावेळी उपस्थित होते.

दुग्धोत्पादनात अग्रेसर 'अमूल' हा ब्रँड प्रस्थापित करणारी गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF) सेंद्रिय कृषी उत्पादनाच्या बाजारात उतरलीय. अमूलतर्फे सुरुवातीला सेंद्रिय गव्हाचे पीठ बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहे.

अमूलकडून गव्हाच्या पीठाखेरीज मूग डाळ,चना डाळ, बासमती तांदूळ इत्यादी प्रकारची सेंद्रिय उत्पादने बाजारात विक्रीसाठी दाखल केली जाणार आहेत. अमूलचे प्रक्रिया केंद्र असलेल्या कैरा डिस्ट्रिक्ट मिल्क प्रोड्युसर्स युनियनलाही एसजीएसकडून प्रमाणित करण्यात आले.

सेंद्रिय प्रमाणीकरण (Organic certification) ही संबंधित उत्पादनांची गुणवत्ता निर्धारित करणारी अशी प्रक्रिया आहे, ज्यात सेंद्रिय उत्पादनांची वाढ, स्टोरेज, प्रक्रिया, पॅकेजिंग आणि निर्यातक्षम उत्पादन अशा सर्वच कसोट्यांवर तपासणी केली जाते. देशांतर्गत बाजारपेठ आणि जागतिक पातळीवर सेंद्रिय उत्पादनांची मागणी वाढत आहे. या उत्पादनांना जादा दर मिळत आहे. त्यामुळे देशात सेंद्रिय शेतीचे प्रमाण वाढत आहे.

सेंद्रिय प्रमाणीकरणाच्या मानकांत खालील गोष्टी अंतर्भूत आहेतः

-कृत्रिम रासायनिक निविष्ठांचा ( खते, कीडनाशके, प्रतिजैविके आदी) वापर टाळणे.

-जनुकीय सुधारित (Genetically modified) बियाण्यांचा वापर टाळणे.

-सेंद्रिय उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या शेतात किमान ३ ते त्याहून अधिक वर्षांपासून रासायनिक खतांचा वापर नसावा.

-मूल्यांकनासाठी उत्पादन आणि विक्रीची तपशीलवार लेखी नोंद ठेवणे अनिवार्य.

-सेंद्रिय उत्पादने स्वतंत्ररीत्या साठवून ठेवणे.

-सेंद्रिय उत्पादन निर्मिती केंद्रांची नियमित तपासणी करणे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Jaykumar Gore: दुष्काळमुक्ती अन् रोजगारनिर्मितीस प्राधान्य

Spider Mite Issue: वांग्यावरील लाल कोळीची समस्या

Microgreen Farming: नेदरलँड्समधील मायक्रोग्रीन शेती

Quality Rose Production: दर्जेदार गुलाब उत्पादन हेच ध्येय...

Weekly Weather: किमान तापमानात घट सुरू; सकाळी थंड हवामान

SCROLL FOR NEXT