Pune News : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पुन्हा पावसाने जोर धरला आहे. प्रामुख्याने घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत आहे. सोमवारी (ता.१८) सकाळी आठ वाजेपर्यंत राज्यात २३० मंडलांत अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साचल्याने मूग, उडीद, सोयाबीन, तूर अशा पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. .राज्यात मागील काही दिवस पावसाने काहीशी उघडीप दिली होती. त्यामुळे पिके चांगलीच ताणावर आली होती. अनेक ठिकाणी पिकांना पावसाची गरज होती. काही ठिकाणी पिके सुकत असल्याने शेतकऱ्यांनी पिके सोडून दिल्यात जमा होते. मात्र, आता पुन्हा पावसास पोषक वातावरण तयार झाल्याने जोर धरण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे काही ठिकाणी पिकांना चांगलाच दिलासा मिळत आहे..Heavy Rain: महाराष्ट्रात सर्वदूर मुसळधार पाउस; मुख्यमंत्र्यांचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन .कोकणात धुव्वांधारकोकणात घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळत आहे. ठाणे, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक आहे. या भागात जवळपास १४२ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. तर सिंधुदुर्गात सुरू असलेल्या संततधारेने जिल्ह्यात दाणादाण उडाली आहे. तळेरे मंडळात राज्यातील सर्वाधिक २२१ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. सर्वत्र मुसळधार झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही मार्गांवरून पुराचे पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. काही नद्या धोक्याच्या पातळीनजीक पोहोचल्या आहेत, तर काही मार्गांवर दरडी कोसळल्या आहेत..मध्य महाराष्ट्रात संततधार पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडील घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत आहे. प्रामुख्याने मुळशी धरणक्षेत्रात सर्वाधिक ७० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. त्यामुळे धरणात वेगाने आवक वाढत असून अनेक भरली असल्याने धरणातून पुन्हा विसर्गात वाढ करण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असल्याने धरणातील पाण्याची आवक होत आहे. यामुळे जिल्ह्यातील सहा प्रमुख धरणांपैकी पाच धरणांतून विसर्ग केला जात आहे. .वारणा धरणातून ६६३० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. वारणा धरण पाणलोटक्षेत्रात ८३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोल्हापुरच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वच धरणांमधून अतिरिक्त पाणी सोडले जात आहे. राधानगरी धरणाचे सर्वच्या सर्व सात स्वयंचलित दरवाजे उघडले असून, त्यातून भोगावती नदीपात्रात ११,५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याशिवाय, काळम्मावाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. सोलापुरात पावसाचा जोर अधिक वाढल्याने शेतातील उभे पीक पाण्यात गेल्याचं चित्र आहे..Monsoon Rain: कोकण आणि घाटमाथ्यावर दोन दिवस रेड अलर्ट.विशेषतः भात, सोयाबीन, आणि मका या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. काही ठिकाणी नाल्यांना पूर आल्याने शेतीचे पाणी बाहेर निघण्यास अडथळा निर्माण झाला आहे. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर तालुक्यात प्रशासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. खानदेशात पावसाने दडी मारली होती. मागील दोन दिवस काही भागात जोरदार ते मध्यम पाऊस झाला आहे. पण नाशिक जिल्ह्यातील विविध भागांत लाभक्षेत्र असलेल्या जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमधील मन्याड प्रकल्पात मागील सुमारे आठ ते १० दिवसातच जलसाठा वाढला आहे..मराठवाड्यात जोर धरलामराठवाड्यात सलग चौथ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरूच आहे. सहा जिल्ह्यांतील तब्बल ३८ मंडलांत अतिवृष्टी झाली. ज्या भागात अति जास्त पाऊस झाला त्या भागातील नदी नाले एक होऊन पीक पाण्याखाली गेली आहेत. काही ठिकाणी पिकांबरोबरच इतरही वित्तहानीही झाल्याच्या घटना पुढे येत आहेत. धाराशिव जिल्ह्यात झालेल्या ढगफुटीसदृश पावसाची चार तालक्यांतील १५ महसूल मंडलांतील ५३ गावांना बाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या गावांतील १५ हजार ५९० शेतकऱ्यांच्या १५ हजार ३२६हेक्टवरील पिकांचे पावसाने नुकसान झाले असून नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहेत..विदर्भात अनेक ठिकाणी संततधारविदर्भातील अनेक भागात संततधार पाऊस झाला आहे. प्रामुख्याने या अकोला भागात मेहकर, मालेगाव, पातूर, बाळापूर आदी तालुक्यांत जोरदार पाऊस झाला आहे. मेहकर तालुक्यात सर्वदूर पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अवघ्या अडीच महिन्यांतच मागील वर्षाच्या तुलनेत जास्त पावसाची नोंद झाली आहे. मागीलवर्षी सरासरी ८१३.२ मिमी पाऊस पडला होता. तर यंदा १८ ऑगस्टपर्यंतच ८३६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अजून दीड महिना पावसाळा शिल्लक असल्याने यावर्षी हा आकडा हजार मिलिमीटरचा टप्पा पार करेल अशी स्थिती आहे..अमरावती विभागातील पाच जिल्हयात सुरु असलेल्या पावसामुळे तब्ब्ल दोन लाख ९५ हजार ८४३ हेक्टरचे नुकसान झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. यातील सर्वाधीक ९९ हजार ६५६ हेक्टरचे नुकसान एकट्या वाशीम जिल्ह्यात झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. त्यापाठोपाठ अकोला, यवतमाळ या जिल्ह्यात नुकसान झाल्याचे सांगण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.