Kandalvan Agrowon
ॲग्रो विशेष

Mangrove Cultivation : कांदळवन लागवडीसाठी उत्तन येथे पर्यायी जागा

KAndalvan : विकासकामात येणाऱ्या कांदळवनाच्या लागवडीसाठी वन विभागाला पर्यायी जागा उपलबध करून देणे आवश्यक आहे.

Team Agrowon

Bhayandar News : मिरा-भाईंदर महापालिकेकडून हाती घेण्यात आलेली अनेक विकासकामे कांदळवनामुळे थांबून राहिली आहेत. विकासकामात येणाऱ्या कांदळवनाच्या लागवडीसाठी वन विभागाला पर्यायी जागा उपलबध करून देणे आवश्यक आहे.

आतापर्यंत महापालिकेकडे अशी जागा उपलब्ध नसल्याने विकासकामांची प्रगती थांबली होती. आता उत्तन येथे नऊ हेक्टर जागा कांदळवन कक्ष पर्यायी जागा म्हणून निश्चित झाली आहे. त्यामुळे कांदळवनामुळे थांबलेली विकासकामे करणे शक्य होणार आहे.

मिरा-भाईंदर शहराच्या तीन बाजू खाडीने वेढलेल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी कांदळवन मोठ्या प्रमाणात आहेत. महापालिकेची अनेक आरक्षणे कांदळवन असल्यामुळे विकसित झालेली नाहीत. कांदळवनाची कापणी करण्यास कायद्याने मनाई आहे.

विकासकामांसाठी कांदळवन काढायचे असेल, तर त्यासाठी पर्यावरण विभाग, वन विभाग, तसेच उच्च न्यायालयाकडून परवानगी घ्यावी लागते. त्याचप्रमाणे जेवढी झाडे कापली जाणार आहेत, त्याबदल्यात त्याची लागवडही करावी लागते.

ही लागवड वन विभागाकडून केली जाते व त्यासाठी वन विभागाला पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी लागते. त्यासाठी प्रत्येक झाडामागे ३५ रुपये शुल्क वन विभागाकडून आकारले जाते. मिरा-भाईंदर महापालिकेकडे आतापर्यंत कांदळवन लागवडीसाठी पर्यायी जागा उपलब्ध नव्हती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update : मॉन्सूनचा वेगवान प्रवास; मुंबई गाठली, संपूर्ण मराठवाडा व्यापला, विदर्भात वर्ध्यापर्यंत मजल

Livestock Fodder Management: कमी पावसाच्या परिस्थितीत शाश्‍वत चारा व्यवस्थापन

Kharif Sowing 2026 : देशात कापूस, सोयाबीन, ऊस, भात लागवड पिछाडीवर; भरडधान्य, तूर, मक्याची आघाडी

Farm Loan Waiver: कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यासाठी तयारी सुरु

Khoya Production Mechanization: खवा उत्पादनातील यांत्रिकीकरण

SCROLL FOR NEXT