IFFCO Agrowon
ॲग्रो विशेष

Fake Fertilizer Allegations: ‘इफ्को’वर बनावट खतनिर्मितीचा आरोप निराधार

IFFCO Fertilizer inspection: इफ्कोने अधिकृत स्रोतांतूनच खत खरेदी करण्याचे आवाहन केले आहे आणि विभागीय तपासणी सुरू असल्याची माहिती दिली आहे.

Team Agrowon

Pune News: राजस्थानचे कृषिमंत्री डकरोडी लाल मीणा यांनी अजमेर जिल्ह्यातील काही खत उत्पादन करणाऱ्या फॅक्ट्ररींची तपासणी केली. यामध्ये अ‍ॅक्वा अॅग्री प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे एक युनिटदेखील होते.

जी सागरिका या अधिकृत जैव पोषकद्रव्याचे उत्पादन करते. ही प्रक्रिया इफ्को ब्रॅण्डअंतर्गत पूर्णपणे मान्यताप्राप्त असून, शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळावे यासाठी वेळेवर खत उपलब्ध करून दिले जाते.

तपासणीदरम्यान इफ्को ब्रॅण्डच्या सागरिकाच्या पिशव्या आढळल्या, मात्र डीएपी, पोटॅश आणि इतर नकली खतांशी याचा काहीही संबंध आढळला नाही. सागरिका उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या घटकांमध्ये पोटॅश, जिप्सम, डोलोमाइट इत्यादी आढळले. जे की अधिकृत प्रक्रियेचा भाग आहेत.

मंत्र्यांनी शंका व्यक्त केली, की ग्रॅन्युल्स डीएपीसारख्या बनावट खतांच्या निर्मितीत वापरली जाऊ शकते. यावर इफकोच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून उत्पादन प्रक्रिया, वापरण्यात येणारी सामग्री (पोटॅश, जिप्सम, डोलोमाइट इ.) याबाबत सविस्तर माहिती दिली व खात्री दिली की कोणतीही फसवणूक होत नाही.

इफकोने नागरिकांना आवाहन केले आहे की, अधिकृत स्रोतांमधूनच इफको उत्पादने खरेदी करावीत आणि बनावट उत्पादनांपासून सावध राहावे. खतांच्या नमुन्यांची तपासणी सुरू असून अहवालानंतर संपूर्ण माहिती स्पष्ट होईल. इफकोने कृषिमंत्र्यांना संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट करून सहकार्य केले. सध्या विभागीय तपास सुरू असून इफको प्रशासनासह पूर्ण सहकार्य करत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Shortage Issue: वरकुटे खुर्द, सराफवाडी पाझर तलाव कोरडा

20th Bhimthadi Jatra: पुण्यात १६ डिसेंबरपासून २० वी भीमथडी जत्रा

PDCC Bank Support: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्व पातळ्यांवर पुढाकार: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

Agriculture Officer Suspended: चुकीच्या मूल्यांकनप्रकरणी कृषी अधिकारी निलंबित

Bharati Plant: जुन्नरमध्ये दुर्लक्षित वनस्पतीला ‘भारती’ नावाने मिळाली ओळख

SCROLL FOR NEXT