IFFCO Fertilizer : ‘इफ्को’ची खते अयोग्य दरांनी विकणाऱ्यांवर कारवाई करणार ; ‘इफ्को’च्या वतीने आवाहन; अधिकृत दरपत्रक पुन्हा एकदा जारी

IFFCO Fertilizer Rate : केंद्र सरकारच्या खत नियंत्रण आदेशान्वये बंधनकारक केलेली प्रमाणपत्रे धारण न करता ऑनलाइन प्लॅटफॉर्म मार्फत इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स को-ऑपरेटिव्ह लिमिटेडच्या (इफ्को) नॅनो खतांची विक्री बेकायदेशीरपणे व अधिकृत दरापेक्षा कमी दराने करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.
Fertilizer Use
Fertilizer UseAgrowon
Published on
Updated on

Nano Fertilizers : पुणे ः केंद्र सरकारच्या खत नियंत्रण आदेशान्वये बंधनकारक केलेली प्रमाणपत्रे धारण न करता ऑनलाइन प्लॅटफॉर्म मार्फत इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स को-ऑपरेटिव्ह लिमिटेडच्या (इफ्को) नॅनो खतांची विक्री बेकायदेशीरपणे व अधिकृत दरापेक्षा कमी दराने करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.

यामुळे शेतकऱ्यांची व विक्रेत्याची दिशाभूल होत असून, अशा ऑनलाइन विक्री करणाऱ्यांविरुद्ध ‘इफ्को’च्या मार्फत आता कायदेशीर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ‘इफ्को’च्या नॅनो खतांच्या विक्रीबाबत ‘इफ्को’ने या आधीही स्पष्टीकरण दिलेले आहे.

Fertilizer Use
Fake Fertilizers : ‘बनावट खते, बियाणे विकणाऱ्यांवर गुन्हे नोंदवा’

केंद्र शासनाच्या खत नियंत्रण आदेशाप्रमाणे विहित ‘ओ’ प्रमाणपत्र धारकांनाच अशी खते विकता येतात. मात्र तरीही काही ऑनलाइन प्लॅटफॉर्म असे कोणतेही प्रमाणपत्र नसताना व ‘इफ्को’ने प्राधिकृत केलेले नसतानाही अत्यल्प साठा बाजारातून खरेदी करून अथवा इतर मार्गांनी प्राप्त करून घेऊन अवास्तव दरात विक्री करून ऑनलाइन ग्राहक आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. हे पूर्णपणे बेकायदेशीर असून, शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच ‘इफ्को’च्या खतांची खरेदी करावी, असे आवाहन इफ्कोच्या वतीने करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी खात्रीशीर खते मिळण्यासाठी अधिकृत विक्रेत्यांकडूनच खते खरेदी करावेत, असे आवाहन ‘इफ्को’च्या वतीने करण्यात आले आहे. तसेच अनधिकृत व बेकायदेशीर पद्धतीने खतांची अवास्तव किमतीत विक्री करणाऱ्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म विरोधात ‘इफ्को’ने आता कायदेशीर कारवाईचा बडगा उचलला आहे.

नॅनो खतांचे इफ्कोने अधिकृत केलेले निश्‍चित दर (जीएसटीसहित)

टेबल

नॅनो युरिया ः

विक्रेत्यास विक्री दर - २०४ प्रति ५०० मिलि बॉटल.

शेतकऱ्यांना विक्रीसाठी अधिकतम दर - २२५ प्रति ५०० मिलि बॉटल

नॅनो डीएपी :

विक्रेत्यास विक्री दर - ५४७.५० प्रति ५०० मिलि बॉटल.

- शेतकऱ्यांना विक्रीसाठी अधिकतम दर - ६०० प्रति ५०० मिलि बॉटल 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com