White Onion  Agrowon
ॲग्रो विशेष

White Onion Demand : जीआय मानांकनानंतर अलिबाग पांढऱ्या कांद्याची मागणी वाढली

Onion Market : पांढऱ्या कांद्याला जीआय मानांकन मिळाल्यानंतर झालेली प्रसिद्धी आणि कृषी विभागाने आखलेल्या विविध प्रोत्साहनामुळे पांढऱ्या कांद्याच्या बाजारपेठेला अलिबाग तालुक्यात पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

Team Agrowon

Alibaug News : औषधी गुणधर्म असणारा अलिबागचा पांढरा कांदा बाजारात दाखल झाला आहे. या कांद्याला स्थानिकांसह पर्यटकांचीही पसंती मिळत आहे. पांढऱ्या कांद्याला जीआय मानांकन मिळाल्यानंतर झालेली प्रसिद्धी आणि कृषी विभागाने आखलेल्या विविध प्रोत्साहनामुळे पांढऱ्या कांद्याच्या बाजारपेठेला अलिबाग तालुक्यात पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. तालुक्यातील कार्ले, तळवली, खंडाळे, नेहुली या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पांढऱ्या कांद्याचे उत्पादन घेतले जाते.

भातकापणीनंतर साधारण ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी शेतकरी पांढऱ्या कांद्याची लागवड करतात. यंदा सुमारे २५० हेक्टरवर पांढऱ्या कांद्याची लागवड करण्यात आली आहे.

खंडाळा येथील शेतकरी सुरेश पाटील यांनी सांगितले, की या वर्षी पाऊस चांगला झाला आहे. त्यामुळे कांद्याचे पीकही चांगले आले आहे. सध्या आम्ही कांदा बाजारात आणला आहे. पर्यटकांकडूनही कांद्याच्या माळा खरेदी केल्या जात आहेत.

पांढऱ्या कांद्याच्या माळांसह सध्या रामफळ, रायवळ आंबेही काही ठिकाणी विक्रीसाठी बाजारात दाखल झाले आहेत. ३०० रू. डझन भावाने रायवळ आंबे विकत असल्याचे प्रतीक्षा राऊत या महिला विक्रेतीने सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT