Akola News : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तर कधी संततधार पावसामुळे खरीप हंगामाला जोरदार तडाखा बसला. सोयाबीन सारख्या प्रमुख पिकाचे नुकसान झाल्याने उत्पादकता ३० ते ४० टक्के घटली आहे. याचा प्रभाव प्रशासनाने काढलेल्या पैसेवारीवर पडला आहे. जिल्ह्याची सुधारित पैसेवारी ४७ पैसे म्हणजेच ५० पैशांच्या आत निघाली आहे. पैसेवारी कमी आल्याने नुकसानीच्या परिस्थितीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
यावर्षी जुलै ते सप्टेंबर या काळात खरीप हंगामात अनेकदा अतिवृष्टी झाली. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. सोयाबीन, कापूस, तूर पिकांना फटका बसला. सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या पिकाला शेंगा न लागल्याचे प्रकार सुद्धा समोर आले.
एकूण याचा परिणामी शेतमालाच्या उत्पादनावर झाला आहे. दरम्यान ३० ऑक्टोबर रोजी जिल्ह्याची सुधारित पैसेवारी सरासरी ४७ पैसे जाहीर करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील ९९० गावातील स्थितीची पाहणी करून ही पैसेवारी काढली. पैसेवारी ५० च्या आत निघाल्यास पीक परिस्थिती गंभीर व ५० टक्क्यांच्यावर निघाल्यास पीक परिस्थिती उत्तम असे पैसेवारीचे समीकरण मांडले जाते.
जिल्ह्यात महसुली गावांची संख्या १०१२ आहेत. त्यातील ९९० गावे खरीप पिकांच्या लागवडी योग्य आहेत. त्यामुळे यंदा पाहणी करण्यात आलेल्या गावात पिकांची हानी झाल्याचे दिसून आले.
डिसेंबर महिन्यात चित्र स्पष्ट सप्टेंबर महिन्यात नजरअंदाज पैसेवारी जाहीर..
प्रशासनाने यापूर्वी सप्टेंबर महिन्यात नजर अंदाज पैसेवारी काढली होती. त्यानंतर आता ऑक्टोबरमध्ये सुधारित पैसेवारी काढण्यात आली. आता डिसेंबर महिन्यात पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येणार आहे. पैसेवारीच्या आधारावर शासन दुष्काळाची परिसीमा ठरवत असते. जिल्ह्यातील परिस्थितीवर डिसेंबर महिन्यातील या पैसेवारीने चित्र स्पष्ट होणार आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.