DCM Ajit Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Linking : खत लिंकिंग केलं तर विक्रेत्याचा परवाना रद्द करणार; अजित पवारांचा इशारा

Ajit Pawar : "खत लिकिंग करणाऱ्यांचं लायसन्स रद्द करणार आहे. माझ्या शेतकऱ्याला बळीजबरी करून कोणतंही खत गळ्यात मारायचं नाही. जे बियाणं चांगलं आहे, तेच शेतकऱ्यांना द्यायचं." अशी सूचना अजित पवार यांनी केली.

Dhananjay Sanap

Malegaon Sugar Factory Elecation: खरीप हंगाम तोंडावर आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. यावरूनच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गुरुवारी (ता.२२) खत लिकिंग करणाऱ्या विक्रेत्यांना तंबी दिली आहे. जर खत विक्रेत्यांनी लिकिंग केलं तर ताबडतोब विक्रेत्यावर अॅक्शन घेणार असल्याचा इशाराही अजित पवारांनी आहे.

अजित पवार म्हणाले, "खत लिकिंग करणाऱ्यांचं लायसन्स रद्द करणार आहे. माझ्या शेतकऱ्याला बळीजबरी करून कोणतंही खत गळ्यात मारायचं नाही. जे बियाणं चांगलं आहे, तेच शेतकऱ्यांना द्यायचं." अशी सूचना अजित पवार यांनी केली. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी बारामती येथे जाहीर मेळावा घेतला. यावेळी अजित पवारांनी खरीप हंगाम आढावा बैठकीबद्दल माहिती दिली.

शेतकरी सुपर फॉस्फेट घेत असेल किंवा डीएपी घेत असेल तर हे खत घेतलंच पाहिजे, असं शेतकऱ्यांना सांगत असाल तर कारवाई करण्याचा इशाराही अजित पवारांनी दिला. तसेच अवकाळी पावसामुळे कांद्याचं नुकसान झालं आहे, त्याचे पंचनामे करायला सांगितलं आहे. पण ऊस पिकाला फायदा झाल्याचं अजित पवार म्हणाले.

रस्ते करण्याची ग्वाही

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या हद्दीतील रस्ते पुढील पाच वर्षात पूर्ण करण्याची घोषणा अजित पवारांनी केली. तसेच कारखान्याच्या सभासदांना कसलीही तोशीस करावी लागणार नाही, याची काळजी घेईल, असं आश्वासन अजित पवारांनी दिलं आहे. माझं ध्येय चांगलं आहे. मला कारखाना चांगला चालवायचा आहे. त्यामुळे सामावून घेण्याची आपली तयारी असल्याचं अजित पवार म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: जुन्या पात्र शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या हालचाली

Winter Weather Update: कमान तापमानात घट शक्य

Agriculture Trade: रशियात २० लाख टन क्षमतेचा युरिया प्लांट उभारण्यासाठी करार, शेतमाल निर्यातीचाही अडथळा दूर

Livestock Crisis: पशुधनाच्या संख्येत पाच वर्षांत २५ टक्क्यांनी घट

Local Boyd Election: प्रचारासाठी खर्चाची मर्यादा वाढणार का?

SCROLL FOR NEXT