Shaktipeeth Highway agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ला माझाही विरोध; महामार्ग होऊ देणार नाही : अजित पवार

Kolhapur Shkatipeeth Highway : समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी शक्तीपीठ महामार्ग विरोधात कोल्हापूरसह १२ जिल्ह्यांचे शेतकरी आंदोलन करत आहेत.

sandeep Shirguppe

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गाला १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्याप्रमाणे माझाही विरोध असून हा महामार्ग होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिली. शक्तिपीठ महामार्ग विरोधी समितीच्या शिष्टमंडळाने दुपारी शासकिय विश्रामगृह येथे उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेऊन महामार्ग विरोधाचे निवेदन देऊन चर्चा केली.

समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी शक्तीपीठ महामार्ग विरोधात कोल्हापूरसह १२ जिल्ह्यांचे शेतकरी आंदोलन करत आहेत. शासनाने तत्काळ हा महामार्ग रद्द करावा अशी मागणी केली. तसेच मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री हे स्थगिती असल्याचे केवळ तोंडी सांगतात. परंतु, दुसऱ्याबाजूला शेतकऱ्यांना नोटीस देतात तसेच पर्यावरण विभागाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवतात, हे चुकीचे आहे, असेही फोंडे यांनी सांगितले.

यावर उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘शक्तिपीठ’ महामार्गाला बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध आहे. यासंदर्भातील कोल्हापूरातील आंदोलनाची माहिती आपण पालकमंत्री मुश्रीफ यांच्याकडून घेतली आहे. त्यामुळे माझीही या शक्तिपीठ महामार्गाला ठाम विरोध आहे. हा महामार्ग होऊ देणार नाही. तसेच पर्यावरण विभागाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव दिल्याचे वृत्त चुकीचे आहे.

समन्वयक सम्राट मोरे, कृष्णात पाटील, शिवाजी कांबळे, नितीन मगदूम, आनंदा पाटील, तानाजी भोसले, हिंदुराव मगदूम, रणजित मोरे, अजित पाटील, आनंदा देसाई, सूरज शिंदें, जालिंदर कुडाळकर, शिवाजी पाटील आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Inspiring Farmer Story: दौंड्या काठची आरती अन् दीपक

Crop Loss Relief: अतिवृष्टी अनुदानाचे २५३ कोटी रुपये पोर्टलवर अपलोड

Chana Characteristics: हरभरा वाणांची गुणवैशिष्ट्ये

Leopard Sighting: वाहोलीपाडा परिसरात बिबट्याची दहशत

Foodgrain Production: यंदा देशात धान्य उत्पादनात सुधारणा, पण बंपर पीक नाही, कृषी विभागाचा अंदाज काय सांगतो?

SCROLL FOR NEXT