Soybean Procurement Deadline  Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Procurement Deadline : सोयाबीन उत्पादकांचा विश्वासघात करू नका; केंद्र-राज्य सरकारला अजित नवलेंचा इशारा

Ajit Navle Soybean Procurement : राज्याचा पणन विभाग मात्र केंद्र सरकारने सोयाबीन खरेदीला मुदत वाढ देण्यात आली नसल्याचं स्पष्टीकरण देतं. केंद्र आणि राज्य सरकारच्या चालेल्या खेळावरून सोयाबीन खरेदीला मुदत वाढ दिली नाही, तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल, असा इशारा किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी मंगळवारी (ता.११) दिला आहे.

Dhananjay Sanap

Soybean Procurement : सोयाबीनची खरेदी शेवटच्या दाण्यापर्यंत केली जाईल, अशी ग्यारंटी पंतप्रधान मोदींनी विधानसभा निवडणुकीपूर्वी दिली आहे. सध्या शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन पडून आहे. केंद्र सरकार मात्र २४ दिवस राज्यातील सोयाबीन खरेदीला मुदत वाढ दिल्याचं सांगतं. तर राज्याचा पणन विभाग मात्र केंद्र सरकारने सोयाबीन खरेदीला मुदत वाढ देण्यात आली नसल्याचं स्पष्टीकरण देतं. सोयाबीन खरेदीला मुदत वाढ दिली नाही, तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल, असा इशारा किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी मंगळवारी (ता.११) दिला आहे.

केंद्रीय कृषिमंत्र्यांनी राज्यात सोयाबीन खरेदीला २४ दिवसांची मुदत वाढ देण्यात आल्याचं सांगितलं होतं. परंतु राज्य पणन विभागाने ती पूर्वलक्षी मुदत वाढ असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. त्यावरून शेतकऱ्यांमध्ये आणि शेतकरी नेत्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे.

यावेळी डॉ. नवले यांनी राज्य पणन विभागाच्या कारभारावरही जोरदार टिका केला. नवले म्हणाले, "महाराष्ट्राचं हेच ते पणन विभाग आहे, ज्याने शेतकऱ्यांना एसएमएस पाठवले. शेतकऱ्यांचं सोयाबीन ट्रॅक्टरसारख्या विविध वाहनातून खरेदी केंद्रावर घेऊन यायला सांगितलं. आज महाराष्ट्रातील खरेदी केंद्रांसमोर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या रांगा पणन विभागाने लावल्या आहेत. परंतु आता सोयाबीन खरेदी केलं जाणार नाही, असं पणन विभागाने जाहीर केलं आहे. किंबहुना शेतकऱ्यांकडे पडून असलेल्या सोयाबीन हमीभावापेक्षाही कमी भाव मिळत आहे. या सोयाबीनबद्दलही आम्ही काहीही करू शकत नाही, असा संदेशच पणन विभागाने दिला आहे." असंही नवले म्हणाले.

राज्य सरकारला इशारा देताना नवले यांनी खरेदीला मुदत वाढ देण्याची मागणी केली. नवले म्हणाले, "पणन विभागाचं वागणं अत्यंत संतापजनक आणि विश्वासघातकी आहे. पंतप्रधान मोदी आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी विधानसभेपूर्वी सोयाबीनचा दाणा ना दाणा खरेदी करून असं आश्वासन दिलं. आणि मतं मागितली होती. विधानसभेत दिलेली आश्वासन पूर्ण केलं नाही आणि 'मोदी की ग्यारंटी' म्हणून जाहीर केलेला हमीभाव देण्यात आला नाही तर हा मोठा विश्वासघात ठरेल." असंही नवले म्हणाले.

दरम्यान, सरकारने सोयाबीन खरेदीला मुदत वाढ दिली नाही तर कृषिमंत्र्यांच्या दारासमोर सोयाबीन ओतून आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा किसान सभेने दिला होता. शेतकऱ्यांचा विश्वासघात न करता सोयाबीन खरेदीला मुदत वाढ देण्यात यावी, अशी मागणी किसान सभेकडून करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Acquisition: शेतजमिनीचे बेकायदेशीर अधिग्रहणाचा आरोप

Rabi Sowing: सांगली जिल्ह्यात रब्बी पेरा पावणेदोन लाख हेक्टरवर

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार; कापूस आवक मंदावली, मटारच्या दरात नरमाई, बटाटा आवक चांगली तर ज्वारीचे दर टिकून

Ramling Sanctuary: रामलिंग अभयारण्यातील वाघाच्या वास्तव्याची वर्षपूर्ती

Urea Smuggling: युरिया तस्करीचा डाव उधळला

SCROLL FOR NEXT