Harshwardhan Patil Agrowon
ॲग्रो विशेष

AI in Farming: देशपातळीवर ऊसशेतीत ‘एआय’चा वापर करणार

Sugar Industry Innovation: आता ऊसशेतीतही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होणार! राष्ट्रीय साखर संघाने केंद्र सरकारच्या सहकार्याने ऊस उत्पादन सुधारण्यासाठी ‘एआय’चा समावेश करणारा मास्टरप्लॅन जाहीर केला आहे. ऊस गाळप हंगाम संपल्यानंतर ऊस उत्पादकांसाठी नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

गणेश कोरे

Pune News: आंतरराष्ट्रीय सहकार वर्षा निमित्त देशभरातील ऊस शेतीमध्ये ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या वापरासह गाळप हंगाम संपल्यानंतर मिळणाऱ्या सुमारे २६५ दिवसांमध्ये कारखान्यांचा उपयोग कसा करता येईल आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसा फायदा होईल, यासाठी राष्ट्रीय साखर संघ केंद्र सरकारच्यावतीने कार्यक्रम राबविणार आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी (ता.२२) पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

पाटील म्हणाले,‘‘यंदाच्या साखरेच्या राष्‍ट्रीय हंगामात १७ टक्के साखर उत्पादनामध्ये घट झाली. यामध्ये उत्तरप्रदेशातील २३८ वाणाच्या उसाला झालेला कीड रोगांचा प्रादुर्भाव, महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक राज्यातील उसाला लवकर आलेला तुरा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत ऊस तोडणी कामगार मतदानाला गावाला गेल्याने दीड महिन्यांनी उशिरा सुरू झालेला हंगाम आदि विविध कारणांचा समावेश आहे.

येता हंगाम (२०२६) हा चांगला जाण्यासाठी राष्ट्रीय साखर संघाने विविध मागण्या केंद्र सरकारकडे केल्या आहेत. यामध्ये ऊसतोडणी मजूर टंचाईवर मात करण्यासाठी देशभरात १० हजार हार्वेस्टर घेण्यात येणार आहेत. तर नवीन लागवड तंत्रज्ञानाचा वापरावर भर देण्यात येणार आहे. यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर देशभारत करण्याचा मास्टरप्लॅन केंद्र सरकारच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे.’’

‘एफआरपी एकरकमीच’

एफआरपी एकरकमी १४ दिवसांत देण्याचा कायदा आहे. मात्र आम्ही एफआरपी दोन तीन टप्प्यात सामंज्यस्याने देत होतो. मात्र आता न्यायालयाच्या निकालामुळे एफआरपी एकरकमी द्यावीच लागेल,असेही पाटील म्हणाले.

मक्यापासून इथेनॉल उत्पादनासाठी ‘डीपीआर’

ऊस गाळप हंगाम संपल्यानंतर मिळणाऱ्या सुमारे २६५ दिवसांमध्ये कारखाना सुरू ठेवण्यासाठी मक्यापासून इथेनॉल उत्पादनाचे प्रयोग सुरू आहे. यासाठी महाराष्‍ट्रासह कर्नाटक, गुजरात आणि उत्तरप्रदेशात कॅम्प घेण्यात येणार आहेत. यासाठी उसात मक्याचे आंतरपीक घेऊन, त्याचा वापर इथेनॉल उत्पादनासाठी कसा करता येईल याचा विचार सुरू आहे. हे उत्पादित झालेले इथेनॉल प्राधान्यक्रमाने केंद्र सरकारने खरेदी करावे अशी देखील मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. असेही पाटील यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT