AI In Sugar cane Agrowon
ॲग्रो विशेष

AI In Sugar cane: ऊस लागवडीत ‘एआय’ तंत्र वापरणार

Malegaon Sugar Mill: भाटघर, नीरा देवघर व वीर धरणांत पाण्याची उत्तम स्थिती आहे. तसेच माळेगाव कारखाना कार्यक्षेत्रात आजवर चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे ऊस लागवड चांगली राहणार आहे.

Team Agrowon

Pune News: भाटघर, नीरा देवघर व वीर धरणांत पाण्याची उत्तम स्थिती आहे. तसेच माळेगाव कारखाना कार्यक्षेत्रात आजवर चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे ऊस लागवड चांगली राहणार आहे. ऊस लागवडीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर होण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

याशिवाय उसाचे गाळप वेळात होण्यासाठी कारखाना कार्य स्थळावर सध्या यंत्रसामग्रीच्या देखभाल दुरुस्ती कामाला वेग आला आहे, अशी माहिती मावळते अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप यांनी दिली.

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यात आगामी (२०२५-२६) ऊस गळीत हंगामाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर माळवते उपाध्यक्ष राजेंद्र ढवाण, नवनिर्वाचित संचालक अविनाश देवकाते यांच्या हस्ते रोलर पूजन झाले. या वेळी मावळते अध्यक्ष अॅड. जगताप पत्रकारांशी बोलत होते.

या प्रसंगी ज्येष्ठ नेते बाळासाहेब तावरे, नवनिर्वाचित संचालक शिवराज जाधवराव, राजेंद्र बुरूंगले, देविदास गावडे, प्रताप आटोळे, योगेश जगताप, स्वप्नील जगताप, विजय तावरे, विलास देवकाते, तानाजी कोकरे, नितीन शेंडे, संगिता कोकरे, ज्योती मुलमुले, जयपाल देवकाते, स‍तीश फाळके, गणपत खलाटे, रतन भोसले, कार्यकारी संचालक अशोक पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

अध्यक्ष जगताप म्हणाले, की आगामी गळीत हंगामात ८ लाख टन ऊस माळेगावच्या कार्य क्षेत्रातून उपलब्ध होईल. कार्य क्षेत्रात १८ हजार ९०० एकर गळीतास येणाऱ्या उसाची नोंद आहे. त्यामध्ये सुमारे १० हजार एकर आडसाली, साडेपाच हजार एकर खोडवा आणि पूर्व हंगामी व सुरूची नोंद आहे.

त्यानुसार १५ लाख टन गाळपाच्या उद्दिष्टापर्यंत पोचण्यासाठी उर्वरित उसाची उपलब्धता गेटकेनधारकांकडून होईल. तशा पद्धतीची हार्वेस्टींगची यंत्रणा कराराद्वारे उभी करण्याचे काम सुरू आहे. प्रतिदिनी साडेनऊ हजार टन उसाचे गाळप होणे अपेक्षित आहे.

निवडणुकीनंतरचा पहिलाच हंगाम

माळेगाव कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उमेदवारीसह निळकंठेश्वर पॅनेल २० विरुद्ध १ ने विजयी झाले आहे. चंद्रराव तावरे हे विरोधी गटाचे एकमेव ज्येष्ठ नेते निवडून आले आहेत.

त्यानुसार शनिवारी (ता. ५) अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. या प्राप्त स्थितीचा विचार करताना नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या अधिपत्याखाली पहिलाच आगामी ऊस गळीत हंगाम येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT